Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वेळूवन बुद्ध विहारामध्ये एकदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर व सुभेदार रामजी आंबेडकर यांचा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न* *भारतीय बौद्ध महासभेचा स्तुत्य उपक्रम*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 4, 2025No Comments2 Mins Read

*वेळूवन बुद्ध विहारामध्ये एकदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर व सुभेदार रामजी आंबेडकर यांचा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न*

*भारतीय बौद्ध महासभेचा स्तुत्य उपक्रम*

केज-

भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर व सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.केज शहरातील भीमनगर येथील वेळूवन बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून स्थापित या मातृसंस्थेकडून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतात. धम्म प्रसारासोबतच विज्ञाननिष्ठ समाज घडविण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत असतात.
भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष आयु.डॉ.प्रभाकर ठोके यांच्या अध्यक्षतेखाली व आयु.जयपाल मस्के, चंद्रकांत मस्के, महेंद्र मस्के यांच्या नियोजनाने हे शिबीर व अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.सर्वप्रथम शिबिराची सुरुवात आदर्शांना वंदन व सुभेदार रामजी आंबेडकर यांना अभिवादन करून झाली.यानंतर सामूहिकपणे त्रिसरण व पंचशील घेण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेचे बीड जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आयु.बी.बी.धन्वे यांनी शिबिराचे उद्घाटन केले व प्रमुख मार्गदर्शिका आयुनी.स्वातीताई गायकवाड यांचा परिचय दिला.यावेळी आयुनी.सुनिता कांबळे यांची कन्या कु.पुजा कांबळे हिची सरकारी रुग्णालयात किटकशास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दोन सत्रामध्ये शिबीर संपन्न झाले.पहिल्या सत्रामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा यातील फरक,अंधश्रद्धा ही सामाजिक समस्या तसेच अंधश्रद्धा व भोंदुगिरीचे प्रकार सांगुन महिलांना यात कसे फसवले जाते व त्यांचे शोषण कसे होते याबाबत माहिती सांगितली.

दुसऱ्या सत्रात ज्योतिष शास्त्र आहे का? या विषयावर आयु.बी.बी.धन्वे यांनी विविध दाखले,पुरावे देवून सखोल मार्गदर्शन केले यानंतर आयुनी.गायकवाड यांनी चमत्कारामागचे विज्ञान समजावून सांगण्यासाठी विविध प्रयोग-प्रात्यक्षिके सादर केली.ज्यामध्ये पाण्याचा दिवा पेटवणे,वातीविना दिवा पेटवणे,नारळ फोडल्यानंतर आत वेगवेगळ्या वस्तु निघणे,लिंबु कापल्यानंतर त्यातही वस्तु निघणे,मंत्राने अग्नी पेटवणे व इतर प्रयोग सादर केले.शेवटी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे व बुवा-बाबांच्या भुलथापांना बळी पडु नये असे सांगण्यात आले.शिबीरासाठी आयु.अरुण पटेकर,शिवकुमार मस्के आयुनी.विशाखा ठोके,कौशल्या मस्के, महानंदा गायकवाड,कुसुम मस्के,सुनिता कांबळे,लता वाघमारे,नानी मस्के व इतर बौद्ध उपासक-उपासिका,बालक-बालिका यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस आयु.जयपाल राहूल मस्के यांनी केले.शेवटी सरणत्त घेवून शिबीराची सांगता करण्यात आली.
विजयराज आरकडे

Post Views: 157
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 19

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.