Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सरगम बँजोचे मास्टर जावेद भाई आता अभिनय क्षेत्रात अल्बमच्या पोस्टरचे प्रकाशन !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 3, 2025Updated:February 3, 2025No Comments2 Mins Read
सरगम बँजोचे मास्टर जावेद भाई आता अभिनय क्षेत्रात
अल्बमच्या पोस्टरचे प्रकाशन !  

 

गौतम बचुटे/केज :-
संगीत क्षेत्रात आपल्या सरगम बँजोचे राज्यासह शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात “हर गम मी दुवा..सरगम” म्हणीत प्रसिद्ध असलेला मास्टर जावेद भाई हे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत असून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्याच म्युझिक अल्बमच्या पोस्टरचे प्रकाशन आपल्या जन्मभूमीत कलाकारांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील मास्टर जावेद भाई शेख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी सरगम ढोली बाजा सुरू केला. त्या नंतर त्यांनी अत्याधुनिक सुविधेसह आणि हर गम की दुवा सरगम या घोष वाक्यासह सरगम बँजोच्या माध्यमातून सुमारे ५० बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
हा व्यवसाय करताना त्यांनी उत्तम सेवा, दर्जा आणि प्रामाणिकपणा सुद्धा जपला. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी राज्य आणि राज्या बाहेर फिरत असताना अनेकांचा संपर्क आला आणि त्यातून त्यांनी मित्रपरिवार जोडण्या सोबतच जे जे उत्तम आणि नवीन आहे. ते अंगीकारले.
मास्टर जावेद भाई यांनी आता सात फेऱ्यात परक्याशी होशील गं.. या व्हिडिओ
अल्बम मध्ये अभिनय केला आहे. त्यांचा हा अल्म्ब लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे. त्या अल्मच्या पोस्टरचे अनावरण त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने आपली जनमभुमी साळेगाव येथे त्यातील कलावंत मुख्य अभिनेते प्रेम शिंदे, अभिनेत्री अंजली शिंदे, खलनायिका भूमिका साकारणारे अनंत झाडके यांच्यासह आप्पा वैरागे, दिग्दर्शक दिपक पाटोळे, अतुल जाधव, राहुल कांबळे, जीव लागला तुझ्यावर पाखरा फेम रणजित पाटोळे उपस्थित होते.
या वेळी सरपंच कैलास जाधव, माजी सरपंच सय्यद नूर साहेब, माजी सरपंच नारायण लांडगे, माजी सरपंच दैशाला बचुटे, संभाजी सरवदे, रवींद्र जोगदंड, अमर मुळे,  ज्योतिराव बचुटे, प्रसिद्ध गायक किशोर जावळे, पवन घायतडक, बालासाहेब केकाण, मसु जाधव, गायक अनुज रोकडे, अमोल सरवदे, रामेश्वर शिंदे, रमेश इंगळे, गोविंद टोपे, दादासाहेब जाधव, जय जोगदंड आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 862
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.