Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका इंगळेचा जनविकास महाविद्यालयात भव्य सहकुटुंब सत्कार प्रियंकाने भारताचे नाव जगात गाजवले—-डॉ बाबासाहेब गोरे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 6, 2025No Comments2 Mins Read
खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका इंगळेचा जनविकास महाविद्यालयात भव्य सहकुटुंब सत्कार
प्रियंकाने भारताचे नाव जगात गाजवले—-डॉ बाबासाहेब गोरे  

 

केज-
तालुक्यातील बनसारोळा
येथील जनविकास महाविद्यालयात भारताची पहिली महिला खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका हनुमंत इंगळे हिच्या दैदीप्यमान यशाबद्दल जनविकास महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, सत्कारमूर्ती प्रियंका इंगळे तसेच प्रियंकाच्या मातोश्री सौ. सविता इंगळे, वडील श्री. हनुमंत इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियंका इंगळे हिचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते बुके, शॉल,स्मृतीचिन्ह व रोख 11000/- रुपये देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देत असताना प्रियंका इंगळे हिने खो-खो खेळाविषयीचे स्वअनुभव सांगून विद्यार्थ्यांनी जे कोणते क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन परिश्रम केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी प्रियंकाची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य असतानाही तिने स्वकर्तत्वाने खो-खो सारख्या खेळात सातत्य ठेवून देशातील विश्वचषक खो-खो टीमचे नेतृत्व करून देशाला पहिला विश्वचषक मिळवून देण्याचे काम केले, हे अतिशय महत्त्वाचे असून आमच्या परिसरातील व आमच्या आप्तस्वकीयातील प्रियंकाचा व तीने केलेल्या कामगिरीचाआम्हाला अभिमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त व्यक्त करून तिच्या पुढील वाटचालीस त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. गोपाळ भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉ.सतीश कदम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रियंका इंगळे यांचे नातेवाईक गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 286
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 20

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.