केज येथे कर्करोग व स्त्री रोग आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
केज –

४ फ्रेब्रुवारी रोजी हा कँन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने केज शहरातील सामाजिक संस्था कै. अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्था, उपजिल्हा रुग्णालय, श्रेया हास्पिटल केज यांनी संयुक्त विध्यामाने आयोजित केलेल्या कर्करोग व स्त्री रोग मोफत शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले याशिबिरात शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी केली यामध्ये,कर्करोग,स्त्रीरोग,गुडगे दु:खी,अर्थो,तसेच इतर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरात सात रुग्ण संशयत आढळून आले.तसेच दोन रुग्णांना कँन्सर अढळले आहे. या तज्ञं डॉ.राघवेंद्र राजेश्वरकर, बार्शी/मुंबई डॉ.नंदकुमार पानसे,उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डाँ.दत्तात्रय केंद्रे,
श्रेया हास्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉ.योगेश्वरी थोरात (चव्हाण) डॉ.तेजस थोरात, डॉ.स्नेहा साखरे,डॉ.शितल नेहरकर,
डाँ.श्राध्दा विकास मिरगणे,डाँ. नागरगोजे,टिमच्या उपस्थितीत शिबिर पार पडले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले सर,महेश जाजू,सय्यद सादात मंत्री,सलिम शेख,जब्बार पठाण,तसेच श्रेया हास्पिटलचे सर्व कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालयचे रत्नदीप चाटे औषनिर्माण,अधिकारी
सविता सावंत हे हजर होते
आमच्या संस्थेने केले कार्याचा मोबदला आम्हला मिळाला असुन या शिबिराच्या निमित्ताने आज
नऊ लोकांना आजाराची माहीती झाली आहे.हे कर्करोग शिबिर संपुर्ण जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सय्यद माजेद यांनी दिली.
आज जागतिक कँन्सर दिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या कर्करोग व स्त्री रोग मोफत निदान कार्यक्रमाचे आयोजन करुण कै.अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्था,श्रेया हास्पिटल आणी उपजिल्हा रूग्णालय यांनी खरच एक चांगला उपक्रम राबवून गरजवंत रुग्णांना मदत केली खर तर प्रतेकांनी तिन महिण्याला आपली आरोग्य तपासणी कराला पाहीजे जेने करुण आपले आरोग्य चांगले राहील.खरच आयोजकांचं कौतुक करायला पाहीजे असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डाँ अशोक थोरात यांनी माडले.
कँन्सर हा बरा होणारा आजार आहे काही लोकांच्या मनात आपण आरोग्य तपासणी केली तर कँन्सर निघतो की काय अशी मनसीकता लोकामध्ये झाली आणी लोक तपासणी साठी दुर्लक्ष करुण आजार वाढनू घेतात खर तर लोकांनी न घाबरता आरोग्यची काळजी घेऊन तपासणी करुण घ्यावी असे मत बार्शी कँन्सर हास्पिटलचे डाँ पानसे सर यांनी व्यक्त केले.
