Author: विजयराज आरकडे

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान; खा. रजनीताई पाटील यांच्या मागणीला यश ! ———————– केज दि.४(प्रतिनिधी) देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने आता मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे यासाठी अनेक वेळा राज्यसभेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सौ. रजनीताई पाटील यांनी आवाज उठवला होता व या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने अखेर ही…

Read More

या दोन घटनेने केज शहरावर शोककळा केज- केज शहरामध्ये बप्पा या नावाने प्रसिद्ध असलेले व दलित समाजातील युवक नेतृत्व सुमेध शिंदे यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले. तसेच केज शहरातील प्रतिष्ठि व्यक्तीमत्व व हिरो शोरुमचे मालक आणि आप्पा नावाने प्रसिद्ध असलेले किशोर शेटे यांचे अपघाती निधन झाले. या दोन्ही घटनांनी केज शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. केज शहरातील सुमेध शिंदे हे नगरसेविका पद्मिनबाई शिंदे यांचे चिरंजीव आहेत. शहरामध्ये बप्पा नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा मोठ्ठा मित्रपरिवार होता. दलीत समाजातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. अचानक त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले यामुळे शहरामध्ये व परिसरात मोठी शोककळा पसरली…

Read More

चंदन सावरगाव जवळ बस पलटली चालख गंभीर तर काही प्रवाशी जखमी केज- केज- अंबाजोगाई मार्गावरील चंदन सावरगाव येथे अहमदपूर संभाजी नगर ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ही घटना आज दि. ३०रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले असल्याचे समजते. तर चालक व अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केज उपजिल्हा रूग्णालयात व काहींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची मदत केली.

Read More

मांजरा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण खा.बजरंग बप्पा सोनवणेंच्या हस्ते जलपूजन संपन्न केज/प्रतिनिधी यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आशेचा किरण आहे. जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खा बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले. केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेला मांजरा धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यानिमित्ताने शनिवार (दि.28) रोजी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खा.बजरंग बप्पा सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपली शेती समृद्ध करण्यासाठी, जलसंपत्तीचे महत्त्व आणि तिचा योग्य वापर करण्यासाठी…

Read More

केज शहरातील मुलांचे अपहरण प्रकरणाला वेगळे वळण न्यायालयाच्या निदर्शनाने आरोपीच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा नोंद. केज शहरात अपहरण करते म्हणून काही युवकांनी आरोपी विजय भंडारी यास जबरदस्त मारहाण केली होती. शाळकरी मुलाचे अपहरण करण्याच्या संशयावरून येथील मच्छीमार्केट परिसरात सोमवारी एकास पकडून त्याला बेदम मारहाण करून त्याची कार फोडून नुकसान केल्याप्रकरणी केज न्यायालयाच्या निर्देशानुसार एकूण ११ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. केज येथील भीमनगर भागात अंकुर मस्के याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्याच्या संशयावरून मारहाणीची घटना घडली होती. तर याप्रकरणी पोलिसांनी धनराज वळसे केज, आणि विजय गोपीनाथ भंडारी या सनसर, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन मंगळवारी केज…

Read More

*जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले;* *शेतकर्यासह नागरीक आनंदी* केज- केज तालुक्यातील मांजरा धरण जवळपास शंभर टक्के भरले असून, आज बुधवारी दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केज, धारुर, अंबाजोगाई शहरांसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, मांजरा धरण आज सकाळी ९६ टक्के भरला. मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने जवळपास दुपारी १२ पर्यंत मांजरा धरण भरलं आहे. यामुळे मांजरा धरण प्रशासनाने आज बुधवारी (दि.२५) दुपारी १२:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उंचीने…

Read More

*मांजरा प्रकल्प ९५%भल्याने नदीकाठच्या गावांना इशारा !* गौतम बचुटे /केज :- बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प ९५%भरले असल्याने कोणत्याही वेळी पाणी सांडव्यातून सोडून विसर्गाची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६:०० वा. मांजरा प्रकल्प ९५.०५% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे…

Read More

*मांजरा प्रकल्प धनेगाव नव्वदी पार* *वाचा काय आहेत सुचणा* केज तालुक्यातील मांजरा धरण ९०℅च्या वर भरले असून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे धरण क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क रहावे असे सुरज निकम, शाखा अधिकारी, मांजरा धरण यांनी कळवले आहे. *मांजरा प्रकल्प धनेगाव* ता.केज जि.बीड दि. 24/09/2024 वेळ :- 18:00 वाजता. 📍 पाणीपातळी :- 642.05 मी./ 642.37 मी. 📍 एकूण पाणीसाठा दलघमी = 209.376 / 224.093 📍 मृत साठा दलघमी =47.130 / 47.130 📍 जिवंत साठा दलघमी =162.246 / 176.963 📍 जिवंत पाणीसाठा टक्केवारी : *91.68%* 📍 आवक दलघमी = 2.248 / 168.736 📍 आवक दर = 52.03 क्युमेक्स/ 1838 क्युसेक्स…

Read More

अपहरणाच्या संशयावरून केज पोलीसात चौघा विरूध्द गुन्हा दाखल गौतम बचुटे/केज :- अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संशयावरून एकाला जमावाने पकडुन त्याला बदडून त्याच्या गाडीची नासधूस केली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथे दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास परमेश्वर नारायणराव मस्के यांचा मुलगा अंकुर हा घरी आला व त्याने त्याची आईला सांगीतले की, मागील दोन दिवसा पासुन एका चार चाकी कार मधून दोघे त्याचा शाळेत जाताना माझा पाठलाग करत आहेत. त्या पैकी एक अनोळखी इसम ज्याला दाढी असलेला हा पण दोन दिवसा पूर्वी त्याला चॉकलेट देतो. तु माझ्या सोबत गाडी मध्ये बस. असे म्हणाला. ही…

Read More

विजयानंद आरकडे शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील एकूण १५ शिक्षक,शिक्षिका यांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान केज केज तालुक्यातील नाव्होली येथील जि.प. माध्यमिक शाळेचे स. शि. विजयानंद बाबूराव आरकडे यांना शिक्षकांची पतसंस्था (म.)केज च्या शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षकांची पतसंस्था (म.) केज यांच्या विद्यमाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतीवर्षी शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. काल दि. २२ सप्टेंबर रोजी विजयानंद आरकडे यांच्या सह तालुक्यातील एकूण १५ जि. प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, शिक्षिका यांचा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते राजसाहेब पापा देशमुख,मा.आ. पृथ्वीराज…

Read More