केज राखीव विधान सभेच्या मतदार संघात २१ इच्छुकांनी ४९ नामनिर्देशन पत्र घेतले :
मोठी बंडखोरी होणार
महावीआ का महायुतीला बसणार फटका..?
गौतम बचुटे/केज :- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल पहिल्या दिवशी २१ इच्छुकांनी ४९ नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहेत. त्या मध्ये समाजवादी पार्टी-१, भारतीय जनता पार्टी ४,भारतीय युवा जन एकता पार्टी-४, बहूजन महा पार्टी-४, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)-४, टिपू सुलतान पार्टी-२, शेतकरी कामगार पक्ष-१, वंचीत बहुजन आघाडी-१, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-२, अपक्ष-२५ यांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केले असून अद्याप पर्यंत एकही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर केले नाही.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे, गट विकास अधिकारी प्रियांका टोंगे आणि समृद्धी दिवाणे या मदत करीत आहेत.
———————————————-
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तगडा बंदोबस्त :- निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तथा केज तहसील कार्यालयात सीमा सुरक्षा दलाच्या सशस्त्र जवानांना तगडा बंदोबस्त असून त्यांच्या सोबत पोलीस यंत्रणा देखील सतर्क असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.
———————————————
