*स्वामी विवेकानंद शाळेचा चि. आर्यन मुंडे एम. टी. एस. परीक्षेत राज्यातून सर्वप्रथम*
*—————————————–*
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, मु.अ. वसंत शितोळे, वर्गशिक्षक, बालकृष्ण चोले, एम.टी.एस. समन्वयक टिंगरे बी. एम. गणेश भालेकर व पालक आदी दिसत आहेत.
*—————————————–*
: ( केज प्रतिनिधी )* महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ प्राथमिक विभाग ] या शाळेतील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी चि. मुंडे आर्यन अंगद याने ३०० पैकी २७६ गुण मिळवून राज्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे यांच्या उपस्थित आर्यनचा तसेच पालक अंगद मुंडे व सुरेखा मुंडे यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र तसेच ६००० रुपये रकमेचा चेक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मु.अ. वसंत शितोळे, वर्गशिक्षक, बालकृष्ण चोले, सुरेखा डांगे, अपर्णा देशपांडे, एम.टी.एस. समन्वयक टिंगरे बी. एम. गणेश भालेकर, श्रीराम सूर्यवंशी, रामराव शेप आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शैलाताई इंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच अंगद मुंडे सर यांनीही याप्रसंगी आर्यनच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वरील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, सचिव गिन्यानदेव गदळे, संचालक फजीलोद्दीन काजी, नारायण अण्णा अंधारे, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
