Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कर्तृत्व आणि दातृत्व दोन्ही श्रेष्ठ समजणारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 23, 2024Updated:October 23, 2024No Comments2 Mins Read

*कर्तृत्व आणि दातृत्व दोन्ही श्रेष्ठ समजणारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन*

गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे जसे कर्तव्य कठोर आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे पोलीस अधिकारी मात्र दातृत्वाला देखील श्रेष्ठ मानणारे पोलीस अधिकारी आहेत.

केज येथील टोल नाक्यावर एचपीएम कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी मुख्य रस्त्यावर टाकलेल्या माती आणि सिमेंटच्या तुकड्यांच्या अडथळ्यामुळे भीषण अपघातात झाला होता. या अपघातात आईच्या कुशीत असलेल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा उजवा हात खांद्या पासून तुटून पडला आणि तो तब्बल अठरा तासा पेक्षा जास्त अवधी नंतर अपघातस्थळी आढळून आला. तसेच या अपघातात त्या चिमुकलीची आई, बहीण, आज्जी, चुलता आणि गाडी चालवीत असलेला ड्रायव्हर हे सहाजण गंभीर जखमी झाले आणि भाड्याच्या गाडीचा चकनाचुर झाला.
हात गमावलेल्या त्या चिमुकलीवर अंबाजोगाई येथे उपचार केल्या नंतर आता तिला लातूर येथे हलविले आहे.
मात्र त्या चिमुकलीचे आई-वडील हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचे मूळ गाव हे नांदेड जिल्ह्यातील असून उपजिविकेसाठी संभाजी नगर येथे विस्थापित झालेले आहेत. प्रणिती आणि नवनाथ जाधव कुटुंब हे रांजणगाव (शेणपुंजी) येथे वडापावचा गाडा चालवतात.
त्या लहानग्या जीवावर उपचार करण्यासाठी जाधव कुटुंब हे आर्थिक अडचण असल्याने त्यांना केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पाच हजार रु. ची आर्थिक मदत केली आहे. या त्यांच्या आधी केले मग सांगितले अशा कृतीतून त्यांच्यावर असलेले संस्कार आणि संकट काळात कर्तव्या सोबतच दातृत्व देखील महत्वाचे आहे हे दिसून येते.
—————————————————–

*यांनीही केली मदत :-*
पत्रकार अ. र. पटेल यांच्या माध्यमातून ॲड इस्माईल गवळी (१० हजार) रू. तसेच निलंगा येथील उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनीही चिमुकलीच्या उपचारासाठी मदत केली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 40
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.