केज शहरात इमर्जन्सी (तातडीचे) रक्तदान शिबीरात 16 रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान आई व मुलीने केले रक्तदान केज: अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा झालेला असल्याने तेथील रक्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ब्लड बँकेच्या विनंतीवरून रोटरी क्लब ऑफ केज, रामकृष्ण परमहंस परिवार केज व संस्कार प्रतिष्ठान केज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि 12 जून रोजी हनुमान मंदिर वकिलवाडी केज येथे सकाळी 10-30 वाजता इमर्जन्सी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आंबेजोगाईच्या ब्लड बँकेवर केज तालुक्यातील रुग्ण अवलंबून आहेत. एरवी दिनविशेष व महापुरुष आणि राजकीय नेते व इतर लोकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. अशा वेळी सामाजिक निष्ठेपेक्षा व्यक्ती निष्ठा किंवा भावना बाळगून…
Author: विजयराज आरकडे
आणखी एक आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला *आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी* गौतम बचुटे/केज :-सोशल मीडियावर सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध केज पोलिसांनी कठोर पावले उचलले आहेत. पोलिसांनी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडियावर सामाजिक शांतता आणि कायदा संस्थेला बाजार आणणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट विविध समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाईचे पावले चालली आहेत. मागील काही दिवसात केज तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी अशा अनेक समोर कारवाया करून त्यांना कायद्याचा बडगा दाखविला आहे. दरम्यान अशाच…
सरकारने शब्द देऊनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ झाले नाही , १५ आॕगष्ट पासून पुन्हा उपोषण करावे लागणार – धनंजय कुलकर्णी केज समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी आंदोलन करत आहे १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध परशुराम आर्थिक विकास महामंडळ करु न शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे १५ आॕगष्ट च्या आत जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी ५०० कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करेल व…
चेहऱ्यावर मिसुरड फुटल नाही त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहु नये- अमोल मिटकरी बारामती- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल त्यांचे पुतने योगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माणिक बाग बारामती येथे भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या विरोधात निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून लोकमत न्यूज या मराठी वृत्तवाहिनी ने अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले आहे की, जे अजितदादा समोर वाढले, ज्यांच्या तोंडावर अजून मिसुरड फुटल नाही त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहु नये. असे विधान केले आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव…
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक गौतम बचुटे/केज :- सोशल मीडियावर सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट तालुका कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या असामाजिक घटका बाबत केज पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. आता पर्यंत केज पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत तर एका आरोपीला पोलीस पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केज तालुक्यातील एका उवकाने य् भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बाबत एका गाण्यावर आक्षेपार्ह शब्द वापरून हावभाव बदनामीकारक व दोन समाजात तेढ…
संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी रोखठोक न्युज चे संपादक बाबासाहेब मस्के तर सचिव पदी रवींद्र मेटे यांची निवड. केज प्रतिनिधी. संघर्ष पत्रकार संघ केज यांची सालाबादा प्रमाणे आज बैठक होऊन अध्यक्ष,सचिव व इतर पदार्थ साठी आयोजित केले असता माजी तालुकाध्यक्ष श्रीराम तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव अनिल गंलाडे यांच्या सुचवलेल्या नावा प्रमाणे रोखठोक न्युज चे संपादक बाबासाहेब मस्के यांची निवड झाली.तर माझी सरकार या वार्तापत्राचे केज तालुका प्रतिनिधि रविंद्र मेटे यांची सचिव पदी, उपाध्यक्ष ज्योतीराम सांवत, कोषाध्यक्ष पदी सचीन साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळेस संघातील सर्व सदस्य अनिल गलांडे, श्रीराम तांदळे, रोहन गलांडे, वाजेद शेख, अशोक भोसले, हनुमंत…
कोरड्या ओढ्याला अचानक आले पाणी , टँकरची वाट बघणाऱ्या ग्रामस्थांमध्ये फुटला आनंदाचा झरा कुतुहल वाटणारी घटना नेकनूर, मनोज गव्हाणे नेकनूरच्या उत्तरेला पाच किलोमीटरवर डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या बीड तालुक्यातील आनंदवाडी येथील दोन दिवसाला येणाऱ्या टँकरची वाट बघणाऱ्या ग्रामस्थांना शनिवारी सकाळी सुखद धक्का बसला गावाच्या बाजूला असलेल्या उंबराचा वडा या ठिकाणी कोरड्या ओढ्यात गुडघाभर पाणी साचलेले दिसले विशेषतः ना पाऊस,ना कोणाचे बोअरवेल झाले नसताना ओढ्याला पाणी कुठून आले हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत पाण्यात स्वतःला भिजवून आनंद व्यक्त केला. गावातील सगळे बोअरवेल आटले ,विहिरीनी तळ गाठला , पाण्याच्या वाढीव टँकरसाठी ग्रामस्थ सोमवारी जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार अशी परिस्थिती असताना बीड तालुक्यातील आनंदवाडी…
तळागाळातील प्रश्नांची जाण असणारा चेहरा म्हणजे रमेशरावजी आडसकर बस्स नामही काफी है..! रमेश आडसकर यांनी राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून केली. ते प्रथमच जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेले अन् उपाध्यक्ष ही झाले. या प्रमाणे यशस्वी सुरुवात झाली. यावेळी त्यांनी संधीचे सोने करत विविध योजनेच्या माध्यमातून अनेक कामे करुन जिल्हा परिषदेच्या पदाची आणि त्यांच्यातील विकास कामे करण्याची चुणूक दाखवून दिली. ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना त्यांनी वस्ती,तांडे, वाडी पर्यंत आणि अत्यंत सामान्य माणसापर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे रमेश आडसकर म्हणजे तळागाळातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. आडसकर म्हटले की, हबाडा याची आठवण होते. माजी आमदार…
व्ही. डी. बनसोडे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त केज दि. ३१ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी मागच्या काही वर्षांपासून पुणे येथील सिंचन भवन येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल दामोदर बनसोडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयाच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करून निरोप देण्यात आला. विठ्ठल दामोदर बनसोडे मागच्या ३८ वर्षांपूर्वी पाटबंधारे खात्यात रुजू झाले होते. अनेक वर्षे केज, अंबाजोगाई आणि फलटण येथे सेवा केल्यानंतर त्यांची बदली पुणे येथील सिंचन भवन येथे झाली होती. पुणे येथे त्यांच्याकडे खडकवासला पाटबंधारे विभागात मालमत्ता विभागाची जबाबदारी होती. तिथेही अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्यानंतर दि. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान सिंचन भवन…
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन केज- महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृति आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे. या निर्णयाला विरोध म्हणून केज तालुका जिजाऊ ब्रिगेडने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीला विरोध करणारे निवेदन बीड जिल्हा अध्यक्षा राधाताई रामदास सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली केज येथे तहसील कार्यालयातील पेशकार नन्नवरे यांना निवेदन दिले. मनुस्मृति हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजांचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखनारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदु धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरापेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहे. तसेच छत्रपती…