चेहऱ्यावर मिसुरड फुटल नाही त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहु नये- अमोल मिटकरी
बारामती-
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल त्यांचे पुतने योगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माणिक बाग बारामती येथे भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या विरोधात निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे.
यावर प्रतिक्रिया म्हणून लोकमत न्यूज या मराठी वृत्तवाहिनी ने अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले आहे की, जे अजितदादा समोर वाढले, ज्यांच्या तोंडावर अजून मिसुरड फुटल नाही त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहु नये. असे विधान केले आहे.
आताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुक बद्दल दोन्ही पवार गटाच्या बाजूने जोरदार तयारी व आरोप प्रत्यारोप पहायला मिळणार असल्याचे चर्चा रंगू लागल्या आहेत.
