Author: विजयराज आरकडे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी व्हावा – प्रा. डॉ. अर्चना वाघमारे केज दि २०(प्रतिनिधी) बदलती जीवनशैली, वाढलेला भौतिक सुविधांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मानवी जीवन आज सर्वोच्च उंचीवर आहे. त्याचबरोबर आज भारतासहसंबंध जगात पर्यावरण प्रदूषणाची समस्या ही अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये पोचली आहे. त्यामुळे सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा .डॉ. अर्चना वाघमारे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय, केज येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 14 जानेवारी भूगोल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम पाटील तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी ग्लोबचे…

Read More

केज येथे प्रोफेशनल क्रिकेट लिगचे आयोजन केज- प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धेला दि. १९ रविवार पासून सुरूवात करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय स्पोर्ट्स चे संचालक विनोद गुंड, विकास मस्के, पत्रकार विजय आरकडे व सर्व क्रिकेट क्लबचे खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, पत्रकार, इंजिनिअर, व्यापारी, महसूल, व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन शिवाजीराव रामराव पाटील, कानडी रोड येथील मैदानावर करण्यात आले आहे. किरण सारूक, स्वप्नील चाटे, करण मस्के, जहीर इनामदार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत. या प्रोफेशनल क्रिकेट लिगचे पहीले…

Read More

केज नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा : आ. नमिता मुंदडा केज/प्रतिनिधीः केज शहराचा वाढता भोगोलिक विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. आता अल्पावधीतच नगरपंचायतला दर्जा वाढ मिळून नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. शहरातील विकासाला निधीची कमतरता भासत असल्याने यापूर्वी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले. तरीही शहराचा झालेला भोगोलिक विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे नागरिकांची मुलभूत सोयी-सुविधांसाठी परवडच होत असल्याने आमदार नमिता मुंदडा यांनी नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुराव्याला…

Read More

वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी दिव्यांग तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन गौतम बचुटे/केज :- वाल्मीक कराड यांच्यावरचे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. या मागणीसाठी केज तालुक्यातील नाव्होली येथील एक दिव्यांग तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्याच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन देखील केले. या बाबतची माहिती अशी की, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील नाव्होली येथील नानासाहेब भानुदास चौरे या दिव्यांग तरुण सकाळी नाव्होली ते राजेगाव फाटा तेथील पाण्याच्या टाकीवर चढून बसला होता. नानासाहेब चौरे हा हात आणि पायाने दिव्यांग आहे. जो पर्यंत वाल्मीक कराड यांच्यावरील…

Read More

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित; केज/प्रतिनिधी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित करण्यात आले.केज शहराच्या विकासासाठी अहोरात्र तत्पर असल्याचे प्रतिपादन हारूणभाई इनामदार यांनी केले आहे. यापुढे शहरातील शंभर बचत गटाला व्यवसायासाठी निधी केज नगरपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करणार करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले आहे. सावित्रीबाई फुले व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत. जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई…

Read More

हळदीकुंकू समारंभात श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थानचा देखावा; या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक; केज- महिलांचा विशेष सण म्हणून संक्रांतीच्या सनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर जे हळदीकुंकू महीला घरोघरी जाऊन साजरी करतात ते पारंपरिक पद्धतीने सुरू आहेच पण अलिकडच्या काळात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. असेच हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केज येथे कानडी रोड येथे दि. १६ रोजी आयोजित करण्यात आले होते. ते सर्व शहरात कौतुकास्पद ठरले असल्याचे बोलले जात आहे. या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन सौ. पार्वती गाढवे, सौ. रेखा तेलंग, सौ. सुनिता सोनवणे, सौ. मनिषा सव्वासे, सौ. रामकवर तोंडे या महीलांनी केले होते. या हळदीकुंकू कार्यक्रमात श्री क्षेत्र…

Read More

*बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील डॉ.काशिद व डॉ.हिरवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार* केज (प्रतिनिधी ) केज येथील नगर पंचायत व जन विकास परिवर्तन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागातील कार्यरत प्राध्यापक डॉ.एन.जी.काशिद व डॉ.बी.जे.हिरवे यांना प्रदान करण्यात आला.नगर पंचायतीच्या प्रांगणात झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात शिक्षण, पत्रकारिता, वैद्यकीय शिक्षण,संगित,महिला बचतगट इत्यादी क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. न.प.च्या नगराध्यक्षा सीता ताई बनसोड, हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते डॉ.काशिद व डॉ.हिरवे यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामाबद्दल पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या…

Read More

सरस्वती महाविद्यालयात विद्यापीठ नाम विस्तार दिन साजरा केज-(प्रतिनिधी) उपेक्षित, वंचित, गरीब, मजूर,शेतकरी यांच्या प्रवाहा बाहेरील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे मराठवाड्यासारख्या अविकसित भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून खुली केली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नाम विस्तार दलित, उपेक्षित आणि बहुजनांचा विचाराचा विजय असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय केज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विस्तार दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते. अध्यक्ष समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, विद्यापीठाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे ही फक्त बाबासाहेबांना नव्हे तर…

Read More

रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय साहित्य व खाऊचे वाटप केज – स्व. रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व पत्नी सोनल यांनी आईने शिक्षण घेतलेल्या बोरगाव (बु) येथील जि. प. शाळेत दि. ६ रोजी विद्यार्थ्यांना तिन डझन लेझीम व सर्व विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करून स्मृतीशेष आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन केले. या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक देशमुख एस. बी. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर संग्राम आरकडे , पत्रकार विजय आरकडे तसेच साकरबाई आरकडे, प्रभावती आरकडे,    स्मिता आरकडे,   कविता गायकवाड, मनिषा आरकडे, भैय्यासाहेब आरकडे, रोहीत गायकवाड, जयश्री गायकवाड, योगेश आरकडे, बोरगाव (बु ) शाळेचे शिक्षक…

Read More

विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांची केज पोलीस ठाण्यात चौकशी गौतम बचुटे/केज :- केज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी ज्या खंडणी प्रकरणाचा सबंध जोडला जात आहे; त्या खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणातील सीआयडीच्या ताब्यात असलेला आरोपी अनुक्रमे विष्णू चाटे आणि जयराम चाटे याला तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग ता केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या दि. ९ डिसेंबर रोजी अपहरण करून झालेल्या हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये नंतर विष्णू चाटे हा देखील फरार झाला होता. त्या नंतर तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला पोलिसांनी…

Read More