बालनाट्य स्पर्धकांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली
बीड:-
राज्यस्तरीय
बालनाट्य स्पर्धेमध्ये सिंधफना पब्लिक स्कूल माजलगाव या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी
“सर तुम्ही गुरुजी व्हा”…
ही बालनाटिका यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर बीड या ठिकाणी सादर केली. यामध्ये साने गुरुजीच्या मुख्य भूमिकेत ओजस कुलकर्णी तसेच स्वयंम घायतिडक,
अभिनव विटेकर,
अभिरा देशमुख,
भक्ती गंगणे,
वेदिका आगे व इतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
या नाटकासाठी मार्गदर्शन आणि दिग्दर्शन या शाळेतील नाट्यविभागाचे शिक्षक श्री. सखाराम जोशी सर यांनी केले.
विद्यार्थी व पालक यांच्या तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारा आणि समाजात आदर्श शिक्षक घडवणारा कळीचा विषय निवडल्यामुळे या नाटकाची सर्वत्र चर्चा होत आहे. या बद्दल शाळेच्या वतीने अध्यक्ष आ.प्रकाशदादा सोळंके, उपाध्यक्ष विरेंन सोळंके सचिव मंगलाताई सोळंके प्राचार्य अन्वर सर आणि सर्व शिक्षकवृंदानी सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.