नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक होते–
– डॉ. हनुमंत सौदागर
केज दि २५(प्रतिनिधी)
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जय हिंद..! ही घोषणा देऊन भारतीय तरुणांना एकत्र करून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारत मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणारे सरसेनापती सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक असल्याचे प्रतिपादन डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते महानायक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार शिनगारे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महानायक सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना प्राचार्य शिनगारे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढा हा महानायक सुभाषचंद्र बोस यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून राष्ट्र निर्माणसाठी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सीता केंद्रे त्यांनी तर आभार डॉ. नागेश कराळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.