Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

झोपडपट्टी वासियांच्या हक्कासाठी केज येथे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीची स्थापना

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 29, 2025No Comments2 Mins Read

झोपडपट्टी वासियांच्या हक्कासाठी केज येथे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीची स्थापना

 

केज (प्रतिनिधी) – सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे अतिक्रमण कायम करून त्यांना नागरी सुविधा तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी केज येथे बहुजन चळवळीतील नेते बाबुराव गालफाडे यांच्या निवासस्थानी आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी व्यापक बैठक घेण्यात आली. झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी केज शहरातील बाबुराव गालफाडे,  विनायक लोंढे,  भिमराव हजारे, महादेव लांडगे,  सोमनाथ राऊत, शरद कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
केज नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक झोपडपट्ट्या मधून सरकारी जमिनीवर अनेक गोरगरीब कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत आहेत. अतिक्रमित झोपडपट्टी धारकांकडे सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे मालकी हक्क / हक्क विलेख नसल्यामुळे त्यांना रमाई घरकुल, पंतप्रधान आवास योजना, शबरी घरकुल योजना अशा विविध योजनेचा लाभ घेता येत नाही. सरकारी जागेवरील झोपडपट्टीची अतिक्रमणे कायम करण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा झोपडपट्टी धारकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. परंतु प्रशासकीय उदासीनता आणि प्रस्थापित राजकीय लोकांचे असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे झोपडपट्टी वासियांना त्यांचे अधिकार मिळालेले नाहीत.
झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांनी मागील अनेक वर्षापासून सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करून झोपडपट्टी वासियांना त्यांचे मालकी हक्क मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळाले आहे. म्हणून केज शहरातील बहुजन चळवळीत अग्रेसर असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आज व्यापक बैठक घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यात आली. केज शहरातील सर्व अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून दाखल करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.
विजयराज आरकडे

Post Views: 113
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.