*पोलीस निरीक्षक पोहोचले पारधी वस्तीच्या शाळेवर*
गौतम बचुटे/केज :-
कज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे प्रजासत्ताक
दिनाच्या एक दिवस अगोदर एका पारधी वस्तीच्या वस्ती शाळेवर पोहोचले त्यांनीं शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी हितगुज साधत गप्पा मारल्या.
दरम्यान दि. २५ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केज तालुक्यातील कोरेगाव येथील पारधी वस्तीच्या एका वस्ती शाळेला भेट दिली. पारधी वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शाळेतील विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी अनौपचारिक गप्पा मारीत त्यांच्याशी हितगुज साधले.
त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासार्ह नाते दृढ होण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.
