Author: विजयराज आरकडे

नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रशांत नगर येथे केली समस्यांची पाहणी; कामे तातडीने सुरू करण्याच्या दिल्या सूचना; केज : नगरपंचायत केज अंतर्गत प्रशांत नगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांची नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड आणि गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, नाली व घनकचरा व्यवस्थापन या समस्यांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या. नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तातडीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. या भागातील मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यास नागरिकांच्या अनेक…

Read More

केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या तीव्र केज (प्रतिनिधी) – केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ हा सध्या विविध मूलभूत समस्यांमुळे त्रस्त असून परिसराला समस्यांचे माहेरघरच बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची साफसफाई न झाल्याने साचलेले पाणी, तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक बोअरवेलवर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली नसल्याने बोअरवेल वारंवार खराब होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. सिताताई बनसोड तसेच भावी नगराध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले हारूनभाई इनामदार यांनी या भागाकडे तातडीने लक्ष…

Read More

​दिल्ली येथील जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत डॉ.हनुमंत सौदागर यांचा सहभाग ​नवी दिल्ली – २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) च्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या (WSDS) रौप्य महोत्सवी वर्षाचे नवी दिल्ली येथील ताज पॅलेस येथे तीन दिवसीय शिखर परिषदेचे उद्घाटन ​केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले ‘परिवर्तन’ हे केवळ ब्रीदवाक्य न राहता ती एक जागतिक चळवळ बनावी ​जागरूकतेकडून कृतीकडे आता फक्त प्रश्न समजून घेण्याची वेळ राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे.असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्यातून प्रतिनिधित्व सदस्य म्हणून पर्यावरण अभ्यासक डॉ…

Read More

लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केज -( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त दि.१९ फेब्रुवारी गुरुवार रोजी लक्ष्मी नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन मधुर भैय्या मुंडे, उषाताई मुंडे यांनी करुन अभिवादन केले यावेळी प्राचार्य रवि पवारसर यांच्यासह प्रथम द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यी व विद्यार्थीनी सहभागी होऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. केज शहरापासुन जवळच असलेल्या बीड रोडवरील सिध्दीविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे यांनी सुरु केलेल्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे…

Read More

मोहम्मद आहिल काजी यांने पहिला रोजा केला पुर्ण केज दि.20 (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्त्व असुन या महिन्यात मुस्लिम समाजातील बहुतांश महिला पुरुष सात वर्षापुढील महिला व पुरुष यांना या महिन्यात उपवास (रोजा) हा ठेवण्यासाठी आवश्यक समजला जातो.या पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा,संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे.केज येथील साडे सहा वर्षांच्या मोहम्मद आहिल नदिम काजी यांने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून काजी व शेख कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार जोपसतात मोहम्मद आहिल काजी यांने पहाटेच्या सहेरी पासून संध्याकाळच्या इफ्तार पर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न…

Read More

ज्ञानदीप कोचिंग क्लासेस शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न; नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप कोचिंग क्लासेस खंडोबा चौक नांदेड येथे काल कुळवाडी भूषण, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन दिग्रसकर( मुख्याध्यापक गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड) प्रमुख मार्गदर्शक: सुप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. नागराज मगरे प्रमुख पाहुणे सिताराम सोनटक्के सर माजी मुख्याध्यापक दत्ताजी लिंबोळे उद्योजक गंगाधरराव मुळे पाटील श्रीनिवास हार्डवेअर पंडितराव मुळे पाटील त्र्यंबक उदबुके केशव भावे श्री.जाधव सूर्यकांत आचने मोरे सुग्रीव तसेच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जीवनावर पेपर घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम येणारे विद्यार्थी 1)पुनम रणवीर 2) आर्या…

Read More

​केज नगरीत ‘शिवजयंती’चा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने शिवरायांना मानवंदना! ​ प्रकाश मुंडे/ केज – प्रतिनिधी सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत घुमणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आज केज शहराच्या कानाकोपऱ्यात घुमला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केज शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्ये, लेझीम पथके आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण केज शहर शिवमय झाले होते. ​ठळक वैशिष्ट्ये: ​डीजेला फाटा, संस्कृतीला मान: यंदाच्या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवप्रेमींनी डॉल्बीच्या कर्कश आवाजाला फाटा देऊन स्वतःहून बंदी घातली होती. त्याऐवजी ढोल-ताशा आणि वासुदेव पथकांच्या गजराने शहरात एक वेगळेच नवचैतन्य पसरले होते. ​रणरागिणींचा सहभाग: डोक्यावर भगवे फेटे बांधून महिलांनी मोठ्या संख्येने फेरीत…

Read More

आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थिनींनी अभ्यास करावा—-डॉ हनुमंत सौदागर केज – ध्येय निश्चित केल्याच यश प्राप्ती होते. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते केज येथील सरस्वती कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे,प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर,श्री चाळक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री जोगदंड यांनी केले. यावेळी ते म्हणाले संयमाने जग जिंकता येते असे मत व्यक्त केले.श्री चाळक म्हणाले अभ्यास करून परिस्थिती बदलता येते. अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती डोंगरे म्हणाल्या शिस्त आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक…

Read More

*आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे मोफत फराळ वाटप.* उत्तरेश्वर पिंप्री- सामाजिक भान ठेऊन तळागाळापर्यंत आपले काम पोहचावे ह्याच उद्दिष्टाने आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने मनात यत्किंचितही किंतू न ठेवता सामाजिक सलोखा जपत आली असून त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र उत्तरेश्र्वर पिपंरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच सामाजिक, शैक्षणिक,कला क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडीत असून समाजातील सर्वच जातिधर्मातील युवकांचा व वृद्धांचा फाऊंडेशन व मंचाच्या उपक्रमांना यशस्वी पाठिंबा मिळत आहे. निःस्वार्थ भावनेने सेवा घडावी व सामाजिक समतोल राखण्यासाठी…

Read More

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने उपस्थितीतांकडून कौतुकाचा वर्षाव; केज- राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा ही शहरातील नामांकित शाळा आहे.ही शाळा वर्षानुवर्ष संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे असे प्रतिपादन केजचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सुनिल केंद्रे यांनी केले.राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उदघाटक म्हणून उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कलागुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून…

Read More