स्त्री म्हणजे प्रेरणा शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक
— अर्चनाताई आडसकर
जागतिक महिला दिनानिमित्त शारदा इंग्लिश स्कूल केज येथे महिला शिक्षकांचा सन्मान
केज /प्रवीण देशमुख
शारदा इंग्लिश स्कूल केज येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या वतीने व श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस यांच्यावतीने शारदा इंग्लिश स्कूल केज येथे कार्यरत महिला शिक्षकांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रा अर्चनाताई आडसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षकांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ मिश्रा एस एम, उपप्राचार्य श्री सुरज सनी, श्री देशमुख पी एम याची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या संचालिका प्रा अर्चनाताई आडसकर यांनी महिला ही प्रेरणा,शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. हा दिवस महिला वरील अत्याचारा विरोधात लढण्याचा आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्याच्या असल्याचे सांगितले. समाजात व कामाच्या ठिकाणी समानता वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतच सांगितले.
शाळेचे प्राचार्य डॉ श्री मिश्रा एस एम यांनी आपल्या मनोगतात शारदा इंग्लिश स्कूलच्या महिला शिक्षिका ची संख्या साठ पेक्षा जास्त असून त्यांना दिलेल्या सन्मानामुळेच कित्येक वर्षापासून या महिला ज्ञानदानाचे कार्य करत असल्याचे सांगितले. उपप्राचार्य सुरज सनी यांनी संस्थेच्या वतीने पर राज्यातील महिला शिक्षिकांना अतिशय सन्मानाची वागणूक मिळत असल्यानेच मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील महिला शिक्षिका शारदा इंग्लिश स्कूलमध्ये गत अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांना मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम शारदा इंग्लिश स्कूल केज ने केले असल्याचे त्यांनी आपल्या मनोगत सांगितले.
शाळेने व संस्थेने केलेल्या सन्मानाने महिला शिक्षिका भारावून गेल्या होत्या. आगामी काळात आणखी चिकाटीने व जिद्दीने त्यांना ज्ञानदानाचे कार्य करू असे आश्वासन सर्वांच्या वतीने देण्यात आले. सदरील रेखीव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमीज एम एच यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप जयसिंग काळे सर यांनी केला.
