Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

भीषण अपघातात माय-लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; साळेगाव येथील पुरी कुटुंबावर काळाचा घाला;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 27, 2026No Comments2 Mins Read

भीषण अपघातात माय-लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू;

साळेगाव येथील पुरी कुटुंबावर काळाचा घाला;

प्रकाश मुंडे- विषेश प्रतिनिधी:-

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक इतकी भीषण होती की, कारमधील माय-लेकराचा जागीच होरपळून मृत्यू झाला.आष्टी पंचायत समितीचे ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर हा काळाने घाला घातला आहे.

◆नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील साळेगाव येथील ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात होते.कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली.धडक एवढी जोरात होती की धडकेनंतर कारने लगेच पेट घेतला,ज्यामध्ये माय- लेकराला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.दीड तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर अपघाताची भीषणता एवढी होती की, कारचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

◆वडील कीर्तनात असतानाच काळाचा घाला…
श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत.ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 179
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 4
Total Users : 149384
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.