Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यात टॉवरची तार चोरी करताना भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 30, 2026No Comments3 Mins Read

केज तालुक्यात टॉवरची तार चोरी करताना भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू;

गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात पुण्याहून टॉवरच्या तार चोरी करण्यासाठी आलेल्या टोळीतील दोघांचा लोखंडी टॉवर तुटून मृत्यू झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाल्यास त्या दोघांचे प्रेत एका इर्टिगा कार मध्ये घेऊन ते परभणी ते येथे गेले. परभणी येथे गेल्या नंतर मृतदेहा सोबत आलेल्या साथीदार पळून गेल्याने ईर्टिगा चालकाने दोन्ही मृतदेह ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केल्या नंतर घटना उघडकीस आली.
दि. २९ मार्च रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मेदनकरवाडी येथील अविनाश पटोळे वय १७ वर्ष, आकाश श्रीराम आडे आणि त्यांचे साथीदार हे सुरज श्रीराम गिराम याच्या इर्टिगा कार मधून केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरातील डोंगऱ्याचीवाडी शिवारातील टोरँटो पवन चक्की मध्ये निर्माण झालेल्या विद्युत उर्जेचे वहन करण्यासाठी उभारलेल्या टॉवरची तार चोरण्यासाठी आले होते. त्यांनी टॉवरवर चढून तार काढीत असताना टॉवरचे एका बाजूचे संतुलन ढासळल्याने टॉवर एका बाजूला ओढला जाऊन लोखंडी टॉवर तुटून खाली पडला आणि त्यामध्येअविनाश पटोळे वय १७ वर्ष, आकाश श्रीराम आडे यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या साथीदारांनी त्या दोघांचा मृत्यू हा अपघातात झाल्याचे भासवून त्यांना सुरज राजू गिराम याच्या इर्टिगा कार मधून मतांच्या मूळ गावी परभणी येथे घेऊन गेले. परभणी येथे गेल्या नंतर मृतदेहा सोबत असलेले त्यांचे साथीदार दोन्ही प्रेत गाडीत ठेवून पळून गेले. त्या नंतर इर्टिगा चालक सुरज गिराम याने एका ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत याची कुणकुण मयतांच्या नातेवाईकांना लागताच त्यांनी गोंधळ घातला. ही माहिती परभणी येथील पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला लागताच त्यांनी इर्टिगा चालक सुरज गिराम याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्याला केज पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी तिथे रक्त आणि त्यांच्या पायातील पादत्राणे व इतर साहित्यासह व पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
____________________

कार चालक सुरज गिराम याने दिलेली माहिती :- इर्टिगा कारमधून नांदुर घाट येथून मयत अविनाश पटोळे आणि आकाश श्रीराम आडे यांचे मृतदेह परभणी येथे नेण्यात आले त्या कार चालक सुरज गिराम याच्या कडून अशी माहिती समजते की, त्याच्या गाडीतून फिरायला जायचे म्हणून चाकण, पुणे येथून दोघे मयत आणि त्यांच्या सोबत आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत हे सर्वजण आले होते. येथे आल्या नंतर चोरी करताना टॉवर वरून पडून अविनाश पटोळे आणि आकाश श्रीराम आडे यांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांचा रस्त्यावर अपघात झाल्याचे खोटे सांगून त्यांना परभणी येथे घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
____________________

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाची भेट :- घटनास्थळी बीड येथील फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन रक्त मिश्रित माती आणि पुरावे याचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
______________

परभणीचे पोलिस पथकाची भेट :- या गंभीर घटनेची माहिती परभणी पोलिसांना झाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बेद्रे यांनी केजला येऊन सुरज गिराम याची चौकशी केली.

विजयराज आरकडे

Post Views: 180
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 4
Total Users : 149384
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.