जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाभार्यास विड्याच्या पानांची सजावट श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केज( प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहु श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गरूपोर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाभारा हजारो विड्याच्या पानांनी सजवण्यात आला. संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमे निमित्त आलेल्या भक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या दर्शना बरोबरच गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे आशीर्वादही घेतले. याप्रसंगी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची किर्तन सेवा संपन्न झाली. पावनधाम येथे आलेल्या हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था सौ.स्मिता चंद्रकांत…
Author: विजयराज आरकडे
गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शाळेच्या वतीने पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल रुक्माई च्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांकडून फुगडी रिंगण टाळ मृदुंगासह यांचा आनंद लुटला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आषाढी एकादशीच दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक श्री कल्याणकर दिगंबर,जाधव सूर्यकांत, शोभा किडे, संध्या सिंदगीकर,सुग्रीव मोरे आदी पालक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा खाजगीकरणा विरोधात देशव्यापी संप केज- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संलग्न स्वतंत्र मजदूर युनीयन वतीने बुधवारी दि.09 जुलै रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जे कंपन्यांचे खाजगीकरण चालू आहे त्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात केज तालुका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांनी, सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले यांनी केले आहे. सदरील संप विद्युत विभागातील सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात आहे .हा संप बहुजनांचे संविधानिक हक्क कायम ठेवण्यासाठी होत…
केज पोलिसांनी गोवांशिय प्राण्याच्या व हाडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला गौतम बचुटे/केज केज पोलिसांच्या पथकाने गोवंशीय प्राणी आणि इतर प्राणी यांचे कत्तल केलेले हाडे यांची वाहतूक करणारात टेम्पो ताब्यात घेतला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ६ जुलै रोजी पोलीस पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, बीडकडे एक आयशर टैम्पो क्र (एम एच-१२/एच डी-३३४८) येत असून त्या टेम्पो मधून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यात काही तरी संशयित असावे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदीप मांजराने, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस निरीक्षक इनामदार, यांना कारवाईचे आदेश दिले. स्वतः…
खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी बीड: बीडचे खा.बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस दि.६ जुलै रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. तालुकास्तरावर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्याबाबत डॉ.संजय राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रूग्णालय बीड यांनी सर्व वैद्यकिय अधिक्षकांना याबाबत पत्र दिले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करयात येते. यामध्ये ० ते ६…
बीड जिल्ह्यात काँग्रेसकडून नविन तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर; आगामी निवडणुकात काँग्रेस ताकतीने लढण्याचा निर्धार केज- बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वच तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून बीड जिल्हा काँग्रेसने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली असल्याचे यावेळी सांगितले. या नियुक्त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्या सूचनेवरून व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, प्रवीनकुमार शेप, गणेश राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. केज तालुका अध्यक्ष पदी श्री. प्रविण लक्ष्मण खोडसे,बीड ग्रामीणश्री. गणेश आसाराम बजगुडे, परळी वैजनाथ ग्रामीण,अॅड. प्रकाश बापूराव मुंडे,परळी वैजनाथ शहर,श्री. हानिफ करीम सय्यद,अंबेजोगाई…
जि. प. सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल केज- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनिजवळा, शाळेतील इ .इयत्ता दुसरी ते सहावीच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी एमटीएस ओलंपियाड -2025 या राज्यस्तरीय परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता . यापैकी पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर पाच विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे . तसेच उर्वरित पंधरा विद्यार्थीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत . या पदकविजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज शाळेत आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . हनुमंत गायकवाड आणि प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष श्री .प्रवीण मस्के तसेच…
कानडी रोडवर हाय होल्टेज ड्रामा केज- शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता असलेल्या कानडी रोडवर एक दुचाकी वाहन अडवे उभा करून पेटवून देण्यात आले. या मध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. आज सायंकाळी ६-३० च्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेने रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. नेमका हा प्रकार कोणी व का केला हे मात्र समजू शकले नाही.
संपूर्ण ग्रामविकास हेच वसंतराव नाईक यांचे स्वप्न डॉ.हनुमंत सौदागर केज – महाराष्ट्रा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वसलेला असून जोपर्यंत गावचा विकास होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. म्हणूनच संपूर्ण ग्रामविकास हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जलनायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. ते भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावर बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य विजय शिनगारे, डॉ. नागेश कराळे, ग्रंथपाल अशोक घोडके, श्रीकांत लुंगारे, श्री.सुजित नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.…
केज तालुक्यातील सर्वात सुंदर सरकारी शाळेचा बहुमान पटकावला जि.प.मा.शा. भाटुंबा शाळेने केज- पंचायत समिती केज येथील सभागृहात पार पडलेल्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात केजच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने मॅडम यांच्या हस्ते जि.प. माध्यमिक शाळा, भाटुंबा शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना तीन लाख रुपयांचा प्रतिकात्मक धनादेश, विजयी चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये सन २०२४-२५ चे शासकीय व्यवस्थापनाच्या शाळा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन शाळांची निवड केली जाते. या निवडलेल्या शाळा पुढे जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात. भरपूर…