गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी
नांदेड प्रतिनिधी
नांदेड शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शाळेच्या वतीने पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल रुक्माई च्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती तसेच
विद्यार्थ्यांकडून फुगडी रिंगण टाळ मृदुंगासह यांचा आनंद लुटला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आषाढी एकादशीच दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक श्री कल्याणकर दिगंबर,जाधव सूर्यकांत, शोभा किडे, संध्या सिंदगीकर,सुग्रीव मोरे आदी पालक उपस्थित होते.
