Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली पोलीस : आई वडिलांचे स्वप्न झाले साकार ! हातातला कोयता खाली टाकून आता हाती आली लाठी !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 11, 2025No Comments2 Mins Read

अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली पोलीस :
आई वडिलांचे स्वप्न झाले साकार !

हातातला कोयता खाली टाकून आता हाती आली लाठी !

गौतम बचुटे/केज :-
आई अंगणवाडीत खाऊ शिजविण्याचे काम करीत असून वडील एक ऊसतोड कामगार असताना काजल शिनगारे हिने आपल्या प्रयत्न आणि बुद्धीच्या जोरावर मुंबई पोलिसात भरती होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

केज तालुक्यातील कोरेगाव येथील काजल शिनगारे ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही. तिची आई उर्मिला पायाळ-शिनगारे ही अंगणवाडीतील मुलांना खाऊ शिजवून वाटपाचे काम करीत आहे. तर वडील हे ऊसतोड आणि रोजी रोजंदारी करीत आहेत. काजल हिनेही आई वडिलांना मदत करण्यासाठी शाळेत असताना आई वडिलांच्या सोबत ऊस तोडण्याचे काम केले आहे. तसेच तिने लोकांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी देखील केल्याचे काम केले आहे. घरातील गरिबी आणि कसलेही शैक्षणिक वातावरण नसताना तिने कराटेचे देखील कला आत्मसात केली आहे.
तिचे अनेक दिवसा पासून पोलिसात भरती होण्याचे स्वप्न होते. अगदी भल्या पहाटे उठून ती धावणे आणि व्यायाम करून पोलिस भरतीचा सराव करीत असे. मागे दोन वेळेस तिची पोलिस भरतीत अगदी थोड्या गुणांनी तिची संधी हुकली होती. पण मी एक दिवस पोलिसात भरती होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार करीन अशी तिने मनाशी खुणगाठ बांधली होती. त्यामुळे तिने पुन्हा नव्याने तयारी सुरू करून मुंबई पोलिस दलात भरती झाली आहे आणि आई वडील यांचे स्वप्न साकार केले आहे. तिने मिळविलेल्या या यशा बद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
__________________
” डोळ्या समोर ध्येय कायम ठेवून सराव आणि अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक असुन अपयशाने न खचता तयारी केल्यास यश मिळते.”
—- काजल शिनगारे

विजयराज आरकडे

Post Views: 125
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 2
Total Users : 149372
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.