Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अज्ञानाच्या ‘अ’ पासून आश्चर्याच्या ‘आ’ पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात- समाधान महाराज शर्मा; केज येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 11, 2025No Comments1 Min Read

 

अज्ञानाच्या ‘अ’ पासून आश्चर्याच्या ‘आ’ पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात-
समाधान महाराज शर्मा;

केज येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न;

केज/प्रतिनिधी —
केज येथील प.पू.वै.वासुदेव खंदारे गुरुजींच्या कृपाशिर्वादाने चालत आलेला गुरुपोर्णिमा उत्सव यावर्षी देखील विठाई मंगल कार्यालय केज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खंदारे गुरुजींच्या वृंदावन धाम या निवासस्थानी ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदा माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व नंतर वृंदावन धाम येथून प.पू.वै. खंदारे गुरुजींच्या पादुका पालखी मध्ये ठेवून विठाई मंगल कार्यालया पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी खंदारे गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरुमाई खंदारे आईंची पाद्य पुजा करण्यात आली.यावेळी जेष्ठ गुरुबंधु समाधान महाराज शर्मा यांनी गुरुजींनी सर्व साधकांना दिलेली ध्यान प्राणायाम साधना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले,तसेच ध्यान प्राणायाम साधनेने जीवनात कसे अमुलाग्र बदल होतात हे सांगितले व गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच यावेळी प्राचार्य विवेक मिरगणे,दिपाताई काटे व उत्रेश्वर जाधव यांनी गुरुजींनी दिलेल्या ध्यान साधने विषयी अनुभव कथन केले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील खंदारे गुरुजींचे शिष्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सर्व शिष्य साधकांना खंदारे गुरुजींनी दिलेली ध्यान साधना रोज न चुकता करावी यासाठी शर्मा महाराजांनी शपथ दिली.या कार्यक्रमात दिंडीत सहभागी साधकांचा रिंगण सोहळा पार पडला.सर्व ध्यान प्राणायाम साधकांनी गुरुस्मरण करून गुरुपोर्णिमा सोहळा संपन्न झाला.

विजयराज आरकडे

Post Views: 431
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.