विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार
गौतम बचुटे/केज :- केज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, गेवराई पंचायत समिती येथून पदोन्नती झालेले विजयकुमार मस्के हे केज पंचायत समितीच्या पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. तर चिंचोली माळी येथे पूर्वी परिचर म्हणून सेवारत असलेल्या उषा चाटे-गित्ते यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झालेली असल्याने. त्या सुद्धा केज पंचायत समितीला कनिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झालेल्या आहेत.
त्या बद्दल पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, मित्र आणि गावकऱ्यांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी ढोकर, विस्तार अधिकारी अनिल चवरे, ग्रामपंचात अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष धनराज सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था बीडचे मधुकर चोपडे, ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ वरपे, वरिष्ठ सहाय्यक शेख, वरिष्ठ सहाय्यक मामुसदार, माजी उपसरपंच श्रीमंत गित्ते, कांबळे, धनराज सोनवणे, गौतम बचुटे, दिलीप कसबे हे उपस्थित होते.
