Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

महसूल अभियानात केज तालुका अव्वल; उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि राकेश गिड्डे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 1, 2025Updated:August 1, 2025No Comments3 Mins Read

महसूल अभियानात केज तालुका अव्वल;

उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि राकेश गिड्डे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास !

गौतम बचुटे/केज :-

केज तहसीलच्या वतीने शासनाचे विविध उपक्रम राबवित असताना तालुक्यातील नागरिक आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार राकेश गिड्डे हे काम करीत असल्याने सामान्य नागरिक त्यांच्या कार्यपद्तीवर खुश आहेत.

केज तहसीलदार राकेश गिड्डे आणि त्यांची सर्व टीम ही केज तालुक्यात अत्यंत चोखपणे काम करीत आहे. राकेश गिड्डे यांनी तालुक्यातील मतदार नोंदणी, तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्या आहेत. तसेच त्यांना मार्गदर्शन करीत असलेले अंबाजोगाई विभागाचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
केज तहसीलच्या वतीने तालुक्यातील बनसारोळा, विडा, सोनेसांगवी या ठिकाणी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शंका समाधान व महाराजस्व महसूल अभियान आणि शिबिरामध्ये तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तक्रारींचे जाग्यावर निरसन करून त्या संदर्भात निर्णय घेण्याचे काम केले आहे. या अभियानात त्यांनी अनेक वर्षा पासून बंद असलेले शेत रस्ते खुले केले आहेत. तसेच विविध योजने अंतर्गत शेतकरी, शेतमजूर आणि निराधार व दिव्यांग व्यक्तींना मिळत असलेले अनुदान आणि आर्थिक मदत या बाबत असलेल्या त्रुटी यांची दखल घेतली आहे. त्याच बरोबर नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ज्यामुळे गावागावात संघर्ष निर्माण होऊ शकतो अशा स्मशान भूमी त्यावर झालेले अतिक्रमण आणि ज्या ठिकाणी अंत्यविधीसाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही त्या ठिकाणी देखील त्यांनी नवीन जागेचे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा कर यासोबतच स्मशान भूमीवर अतिक्रमणे हटविली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या निगडीत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेत रस्ता होय. परंतु अनेक शेतकरी हे अशा शेत रस्त्यावर अतिक्रमणे करून ते रस्ता बंद करीत असल्याने त्या रस्त्याने वहिवाट करणाऱ्या शेतकऱ्यांना शेत वाहितीसाठी अडचणी येत असल्याने राकेश गिड्डे यांनी असे शेत रस्ते खुले करण्यावर भर दिला आहे. असे रस्ते खुले करण्यासाठी दोन्ही गटांना कधी एकत्र बोलावून समजूत काढून तर ते शक्य नसले तर कायद्याचा बडगा दाखवून ते काम करीत आहेत. मात्र असे काम करताना कुणावर कधी अन्याय देखील होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे.
त्याच बरोबर विविध मागण्या संदर्भात होणारे आंदोलने, उपोषणे आणि निदर्शने या बाबत सबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना आदेश देऊन सामान्य जनतेच्या कामासाठी चोवीस तास ते उपलब्ध असतात. इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार व अपंग योजना, शेतकरी पेन्शन योजने च्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होण्या संदर्भात आधार कार्ड आणि मोबाईल लिंक करणे या विषयी विहित कालावधीत त्यांनी केलेल्या यशस्वी कामाचे कौतुक होत आहे.
कायदा आणि सुव्यस्थेच्या संदर्भात राकेश गिड्डे हे एक शिस्तीचे आणि कठोर आहेत.
____________________
पावसात भिजले पण रस्ता खुला केला :हा नांदूर घाट येथे असाच एक शेत रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार राकेश गिड्डे हे उपस्थित असताना अचानक मोठा पाऊस आला परंतु त्यांनी स्वतः पावसात भिजून तो रस्ता शेवटी खुला करून दिला.
____________________
प्रसंगी कठोर देखील :- राकेश गिड्डे यांनी गेल्या अनेक दिवसा पासून निकाल लागूनही नावावर होत नसलेली जमीन एका महिलेच्या नावावर केली आणि तिला न्याय मिळवून दिला. परंतु एका गावात सार्वजनिक रस्ता अडविला असता तो खुला करण्यासाठी कठोर भूमिका घेत गावकऱ्यांना होणाऱ्या परिणामांची माहिती दिली आणि प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याचे सांगतच रातोरात ते अतिक्रमण हटविले.
____________________
राकेश गिड्डे हे महसूल प्रशासनाच्या राबविलेल्या योजना बाबत बोलताना नम्रपणे सांगतात की, त्यांना त्यांचे अधिकारी नायब तहसीलदार आशा वाघ, नायब तहसीलदार अशोक भंडारी, सुजाता रामटेके यांचे सहकार्य मिळत असल्याने ते काम करू शकतात.
____________________
पुरवठा विभागाच्या तक्रारी बाबत कठोर :- सामान्य नागरिक, शेतकरी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना धान्य मिळणे संदर्भातील तक्रारी आणि त्रुटी यांच्या बाबतीत राकेश गिड्डे हे कठोर असून प्रसंगी अशा स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करण्याचे व असे दुकान निलंबित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.

विजयराज आरकडे

Post Views: 214
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.