केज मांजरसुंबा रोडवर बर्निंग बसचा थरार ! केज जवळ ट्रॅव्हल्स ची बस पलटी : बस पलटी होताच बसने पेट घेतला : २८ प्रवासी जखमी गौतम बचुटे/केज :- केज-मांजरसुंबा रोडवर सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास केज पासून जवळ सांगवी-सारणी वळणावर एक ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बस पलटी होताच बसने पेट घेतला. अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत. दि. १६ मार्च, सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जात असलेली भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस ही केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या सांगवी-सारणीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस मधील जखमी प्रवासी बाहेर पडत असताना…
Author: विजयराज आरकडे
आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; बोरगाव (बु) : काल स्व. रेखा भगवान गोदाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व सून सोनल गोदाम या दांपत्याने जि.प. शाळा बोरगाव (बु) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून आईच्या स्मृतींना अभिवादन केले. स्व. रेखा गोदाम यांनी प्राथमिक शिक्षण याच शाळेत घेतले होते. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षांपासून धनंजय व सोनल गोदाम हे दांपत्य मुंबई-खारघर येथून दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या आदर्श उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ तसेच नातेवाईकांनी गोदाम दांपत्याचे कौतुक केले. यावेळी बन्सी अप्पा आरकडे, संग्राम आरकडे, विजय…
स्त्री म्हणजे प्रेरणा शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक — अर्चनाताई आडसकर जागतिक महिला दिनानिमित्त शारदा इंग्लिश स्कूल केज येथे महिला शिक्षकांचा सन्मान केज /प्रवीण देशमुख शारदा इंग्लिश स्कूल केज येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या वतीने व श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस यांच्यावतीने शारदा इंग्लिश स्कूल केज येथे कार्यरत महिला शिक्षकांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रा अर्चनाताई आडसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षकांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ मिश्रा एस एम, उपप्राचार्य श्री सुरज सनी, श्री देशमुख पी एम…
नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रशांत नगर येथे केली समस्यांची पाहणी; कामे तातडीने सुरू करण्याच्या दिल्या सूचना; केज : नगरपंचायत केज अंतर्गत प्रशांत नगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांची नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड आणि गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, नाली व घनकचरा व्यवस्थापन या समस्यांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या. नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तातडीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. या भागातील मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यास नागरिकांच्या अनेक…
केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या तीव्र केज (प्रतिनिधी) – केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ हा सध्या विविध मूलभूत समस्यांमुळे त्रस्त असून परिसराला समस्यांचे माहेरघरच बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची साफसफाई न झाल्याने साचलेले पाणी, तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक बोअरवेलवर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली नसल्याने बोअरवेल वारंवार खराब होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. सिताताई बनसोड तसेच भावी नगराध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले हारूनभाई इनामदार यांनी या भागाकडे तातडीने लक्ष…
दिल्ली येथील जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत डॉ.हनुमंत सौदागर यांचा सहभाग नवी दिल्ली – २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) च्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या (WSDS) रौप्य महोत्सवी वर्षाचे नवी दिल्ली येथील ताज पॅलेस येथे तीन दिवसीय शिखर परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले ‘परिवर्तन’ हे केवळ ब्रीदवाक्य न राहता ती एक जागतिक चळवळ बनावी जागरूकतेकडून कृतीकडे आता फक्त प्रश्न समजून घेण्याची वेळ राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे.असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्यातून प्रतिनिधित्व सदस्य म्हणून पर्यावरण अभ्यासक डॉ…
लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केज -( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त दि.१९ फेब्रुवारी गुरुवार रोजी लक्ष्मी नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन मधुर भैय्या मुंडे, उषाताई मुंडे यांनी करुन अभिवादन केले यावेळी प्राचार्य रवि पवारसर यांच्यासह प्रथम द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यी व विद्यार्थीनी सहभागी होऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. केज शहरापासुन जवळच असलेल्या बीड रोडवरील सिध्दीविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे यांनी सुरु केलेल्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे…
मोहम्मद आहिल काजी यांने पहिला रोजा केला पुर्ण केज दि.20 (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्त्व असुन या महिन्यात मुस्लिम समाजातील बहुतांश महिला पुरुष सात वर्षापुढील महिला व पुरुष यांना या महिन्यात उपवास (रोजा) हा ठेवण्यासाठी आवश्यक समजला जातो.या पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा,संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे.केज येथील साडे सहा वर्षांच्या मोहम्मद आहिल नदिम काजी यांने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून काजी व शेख कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार जोपसतात मोहम्मद आहिल काजी यांने पहाटेच्या सहेरी पासून संध्याकाळच्या इफ्तार पर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न…
ज्ञानदीप कोचिंग क्लासेस शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न; नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप कोचिंग क्लासेस खंडोबा चौक नांदेड येथे काल कुळवाडी भूषण, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन दिग्रसकर( मुख्याध्यापक गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड) प्रमुख मार्गदर्शक: सुप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. नागराज मगरे प्रमुख पाहुणे सिताराम सोनटक्के सर माजी मुख्याध्यापक दत्ताजी लिंबोळे उद्योजक गंगाधरराव मुळे पाटील श्रीनिवास हार्डवेअर पंडितराव मुळे पाटील त्र्यंबक उदबुके केशव भावे श्री.जाधव सूर्यकांत आचने मोरे सुग्रीव तसेच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जीवनावर पेपर घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम येणारे विद्यार्थी 1)पुनम रणवीर 2) आर्या…
केज नगरीत ‘शिवजयंती’चा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने शिवरायांना मानवंदना! प्रकाश मुंडे/ केज – प्रतिनिधी सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत घुमणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आज केज शहराच्या कानाकोपऱ्यात घुमला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केज शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्ये, लेझीम पथके आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण केज शहर शिवमय झाले होते. ठळक वैशिष्ट्ये: डीजेला फाटा, संस्कृतीला मान: यंदाच्या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवप्रेमींनी डॉल्बीच्या कर्कश आवाजाला फाटा देऊन स्वतःहून बंदी घातली होती. त्याऐवजी ढोल-ताशा आणि वासुदेव पथकांच्या गजराने शहरात एक वेगळेच नवचैतन्य पसरले होते. रणरागिणींचा सहभाग: डोक्यावर भगवे फेटे बांधून महिलांनी मोठ्या संख्येने फेरीत…