युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात गौतम बचुटे, केज :- युसुफवडगाव पोलिसांनी अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणारी एक स्विफ्ट कार ताब्यात घेत त्यातून वाहतूक करण्यात येत असलेल्या दारुसह ४ लाख ६१ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दि. १० ऑक्टोबर रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्ट शेंडगे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले, गृह रक्षक दलाचे जवान पौळ आणि राउत हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त घालीत असताना एका गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चोरटी व अवैद्यरित्या दारू विक्री करण्यासाठी सदर कारमधून दारूची वाहतूक करण्यात येत आहे. माहिती मिळताच…
Author: विजयराज आरकडे
चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न) केज दि.(प्रतिनिधी) गंगामाऊली शुगर च्या पाचव्या गळीत हंगामाला आज सुरुवात करण्यात आली असून या गळीत हंगामाची सुरुवात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मा.खा. रजनीताई पाटील यांच्या हस्ते व चेअरमन लक्ष्मणराव मोरे, ह भ प प्रकाश महाराज बोधले, ह भ प. उद्धव बापू आपेगावकर, किरण पाटील, उद्योगपती राजेंद्र बोडखे , मयूर बोडके,आदित्य पाटील, प्रविण मोरे, राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना रजनीताई पाटील यांनी…
कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले केज / कळंब: कळंब शहरातील बहुचर्चित एमडी (MD) ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश आले असून, या रॅकेटचे थेट केज कनेक्शन समोर आले आहे. या आंतरजिल्हा सिंडिकेटमधील आठवा संशयित आरोपी रेवण सोपान नखाते (रा. केज) याला कळंब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेवण नखाते याच्या अटकेमुळे केज शहरात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, त्याचे पेडलर्स केजमध्ये नेमके कोणाकोणाला ड्रग्ज पुरवत होते, याचा उलगडा आता पोलीस तपासात होणार असल्याने अनेक पांढरपेशांचे धाबे दणाणले आहेत. केजमध्ये कोणाकोणाला ड्रग्जचा…
दु:खदघटना-आदर्श शिक्षक मुब्बशीर अमिनोद्दीन इनामदार यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू केज- आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळा रॊझा मोहल्ला येथे मुलांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर चा पाईप टाकीत सोडत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला व त्यातच ते जमिनीवर कोसळले. त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केजच्या शैक्षणिक विश्वाने एक चांगला शिक्षक गमावला. ते 51 वर्षाचे होते. मुब्बाशीर सर, अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे शिक्षक होते..प्रत्येकाशी त्यांचं वागणं अत्यंत सन्मानपूर्वक असायचे..सार्वजनिक कार्यात त्यांचा पुढाकार होता.. मुब्बाशीर सरांना केजवासियांची भावपूर्ण आदरांजली..श्रद्धांजली..
राजमुद्रा गणेश मंडळाच्या ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे भव्य उद्घाटन व महाआरती संपन्न केज : राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या भव्य ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे उद्घाटन व महाआरती आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या भव्य सोहळ्यास अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. रमेशरावजी आडसकर साहेब, केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, गटनेते मा. हारूनभाई इनामदार, दिलीपराव गुळभिले, रणजितदादा आडसकर, अरुण बप्पा धपाटे, युवक केज तालुका अध्यक्ष शिवदास थळकरी, गजमफर इनामदार, नगरसेवक सुग्रीव भाऊ कराड, राजू इनामदार, खैसर इनामदार, सुशील भैया अंधारे, अजय काळे, सुनील बापू देशमुख, योगेश शिंदे, सुधीर शिंदे, बाळासाहेब नांदे, सुहास गुजर, शिवाजी हजारे, सय्यद…
जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे- प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे शिक्षण, आरोग्य व शिस्त ही नाळवंडीकर गुरुजींची त्रिसूत्रे होती – जी. बी. गदळे सोनवणे आश्रुबा, शिनगारे सुरेश, पाळवदे बाबुराव, मोटे दिपा, राऊत सुनिल हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी. केज प्रतिनिधी: दि. ६ सप्टेंबर- आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात मानवी मूल्ये मागे पडत चालली आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, दयाळूपणा, आदर, कृतज्ञता आणि सहानुभूती यांसारख्या मूल्यांचे धडे देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते समाजात वावरताना जबाबदारीने वागतील. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी…
उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार केज दि ५(प्रतिनिधी) उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना केज तालुका ग्राम सखींच्या वतीने केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील पंधरा दिवस किंवा शासन निर्णय वेळेपर्यंत ऑनलाईन काम बंद करत केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देण्यास पन्नास हून अधिक ग्राम सखींची उपस्थिती होती यावेळी निवेदनावर स्वाक्षरी करून तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ग्रामसखींना अपंगत्व मृत्युमुखी दहा…
शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या ‘डॉन’ला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल केज: दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरून नेताना पकडल्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःला डॉन म्हणवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईताला नागरिकांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर जबरी चोरी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाळासाहेब निवृत्ती ठोंबरे (वय ३५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. एकुरका, ता. केज, जि. बीड, सध्या रा. मधुबन हॉटेलच्या मागे, केज) हे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कीर्ती जनरल स्टोअर समोर आपली मोटारसायकल (क्रमांक एमएच ४४ वाय ७३६९) उभी करून…
हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती; केज, दि. २ सप्टेंबर : केज शहरातील कानडी रोडवरून समर्थ नगरला जोडणाऱ्या नाल्याचे काम सुरू असतानाच नाला खचल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित गुत्तेदाराच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करत यासंदर्भात वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जनविकास आघाडीचे नेते हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व गुत्तेदार यांना कामाच्या दर्जाबाबत धारेवर धरत, नाल्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या…