मनोज भाई संसारे यांच्या पॅंथर योगेश भाई गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा ! केज- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे जिल्हाध्यक्ष योगेश भाई गायकवाड यांनीकेज शहरा अंतर्गत येणारे सर्व अतिक्रमण हटवण्याची मुदत आपण पुढे वाढवावी कारण येणाऱ्या 18 फेब्रुवारीपासून रमजानचा पवित्र असा महिना सुरू होणार आहे व तसेच बहुजन समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुद्धा या महिन्यात येणार आहे व लगेच तीस मार्चला रमजान ईद सुद्धा होणार आहे व 14 एप्रिल सुद्धा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा के शहरांमध्ये साजरी होणार आहे तसेच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जागेमध्ये बाजारपेठ भरली आहे त्यामुळे के शहरातील…
Author: विजयराज आरकडे
केज नगरपंचायत मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील घोटाळा प्रकरणी माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी व्यक्त केले आपले मत; केज दि ३(प्रतिनिधी) केज नगरपंचायत मधील पंतप्रधान आवास योजना (शहरी)’ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर प्रकार चौकशी समिती कडून उघड झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणातील अधिकारी पदाधिकारी यांसह सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केली आहे. गोरगरिबांचे घरे गिळंकृत केली गेली. या प्रकरणावर आदित्य पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून अपहार झालेली पूर्ण रक्कन लाभार्थ्यांना मिळावी.दोषींवर फौजदारी गुन्हे…
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नाही, सिध्द करणार्यास १ लाखाचे बक्षीस– हारुणभाई इनामदार घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी – नगराध्यक्षा सिताताई बनसोड न.प. सत्ताधारी नेत्यांनी हात झटकले; मग घरकुल लाभार्थ्यांचा निधी पळवला कोणी? केज/प्रतिनिधी ३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक, अधिकारी व त्यावेळीच्या संबंधित लोकांनी केलेला आहे. अशी माहिती हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषद द्वारे हारुणभाई…
पर्यावरण रक्षणासाठी भूगोल दिन आवश्यक –डॉ. अर्चना वाघमारे केज – माऊली विद्यापीठ केज, संचलित सरस्वती महाविद्यालय, भूगोल विभागाकडून भूगोल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.बी. पाटील , प्रमुख पाहुणे डॉ. अर्चना वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती सौरभ साळवे (पर्यावरण मित्र) डॉ.नागेश कराळे(भूगोल विभाग प्रमुख) यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीगोल ला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. अर्चना वाघमारे यांनी भूगोल दिनाची सुरुवात, भूगोलशास्त्रज्ञ सी.डी देशपांडे यांचे भूगोल विषयातील योगदान आणि भूगोल दिनाच्या माध्यमातून सजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. पर्यावरण मित्र सौरभ साळवे यांनी, जागतिक तापमान वाढ पर्यावरणाचा…
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचा आज 428वा जन्मोत्सव सोहळा व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा १२ जानेवारी २०२६ : बुवासाहेब पाटील माध्य. व उच्च माध्य.विद्यालय, शिंदी येथे ” राजमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती – युवा दिन” दोन्ही संयुक्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले. या विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सदाशिव मुंडे होते . त्यांनी युवकाना प्रेरणा व जिजाऊंचा आदर्श देऊन प्रोत्साहन दिले तसेच जिजाऊ माँ साहेब यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा . शब्बीर शेख , प्रा . सुशिल राऊत ,प्रा . रामेश्वर चटप , प्रा . शिरीष भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच…
ई बसडेपो व इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार केज विकास संघर्ष समितीच्या प्रदीर्घ लढ्याला यश! केज : केजला बसडेपो सुरु करावा या मागणीसाठी गेली अनेक वर्षे केज विकास संघर्ष समिती शासनाकडे विविध आंदोलने व निवेदनाच्या रूपाने पाठपुरावा करत होती. यासाठी समितीने दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ना प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन पाठपुरावा केला होता. मंत्रिमहोदयानी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेशही दिले होते. केज भेटीमध्ये मा मंत्रिमहोदयाची गाडी आरक्षित बसडेपो जागेजवळ थांबवून त्यांना तातडीची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. अलीकडील काळात केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नाचीही या कामी मोठी साथ मिळाली आहे. आता केज…
केज येथे राज्य परिवहन मंडळाचे ई-बस आगार आणि चार्जिंग स्टेशन मंजूर; आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; केज- प्रतिनिधी केज मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे. केज शहरात आता राज्य परिवहन मंडळाचे (MSRTC) अद्ययावत ई-बस आगार (E-Bus Depot) आणि चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, यामुळे केजमधील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर, प्रदूषणमुक्त आणि हायटेक होणार आहे. प्रदूषणमुक्त प्रवासाचे नवे पर्व वाढते प्रदूषण आणि इंधनाचे दर पाहता राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक बसेसवर भर दिला जात आहे. केजमध्ये चार्जिंग स्टेशन आणि ई-बस आगार झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या…
केजच्या बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्रा.सुरेश कांबळे यांना ‘पीएच.डी.’ प्रदान केज- प्रतिनिधी केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश अर्जुनराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी ‘पीएच.डी.’ (Ph.D.) पदवी बहाल केली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संशोधनाचा विषय आणि मार्गदर्शन डॉ. सुरेश कांबळे यांनी रसायनशास्त्र विषयात “फार्माकोलॉजिकल स्टडी ऑफ सम हेटरो सायकलीक कंपाउंड विथ स्पेशल रेफरन्स टू सोल्युट – सॉलवंट इंट्रॅक्शन्स” (Pharmacological Study of Some Heterocyclic Compounds with Special Reference to Solute-Solvent Interactions) या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. हे संशोधन…
केजमध्ये बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवेने खळबळ; खातेदारांची मोठी गर्दी केज (दि. ३० डिसेंबर): बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने केज येथील बँक शाखेत आज खातेदारांची मोठी गर्दी उसळली. अचानक पसरलेल्या या अफवेमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपले पैसे व सोने सुरक्षिततेच्या दृष्टीने काढून घेण्यासाठी बँकेत धाव घेतली आहे. बुलढाणा अर्बन बँक गोल्ड लोन सुविधा देत असल्याने अनेक खातेदारांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. बँक बंद होणार या चर्चेमुळे सोने सोडवून घेण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याची चिंता अनेक ठेवीदारांना सतावत आहे. सध्या हाताशी पैसे नसल्याने अनेक नागरिक तणावात असल्याचे चित्र…
केजच्या न्यायालयातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व पडद्याआड! जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव अदमाणे यांचे निधन…..!! केज : येथील प्रसिद्ध वकील ऍड जनार्धनराव आदमाने यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने बीड येथे निधन झाले. केजच्या न्यायालयालासतत ‘व्हायब्रेट’ ठेवून चैतन्य निर्माण करणारे जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव आदमाने यांचे केजच्या वकिली व्यवसायात अत्यंत आदराचे स्थान होते. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. वकिली व्यवसायात राहून इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व व संवाद कौशल्याने त्यांनी इतरांवर मोठी छाप टाकली होती. केज येथून इंडियन एक्सप्रेस सारख्या राष्ट्रीय दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या या ज्ञान व संवाद कौशल्याचा अनेकांना हेवा वाटायचा. अवघड व कठीण वाटणारे इंग्रजी भाषेतील मसुद्यांचा मराठी…