ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांचा स्तुत्य उपक्रम;
केज!! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील रमेशराव आडसकर यांचे कट्टर समर्थक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांनी स्वखर्चाने गावातील नागरिकांसाठी मोफत टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की सोनिजवळा येथे गेल्या 30 वर्षांपासून धनेगाव पाणी पुरवठा करणारी योजना सुरू होती परंतु त्या योजनेला बराचसा कालावधी झाल्याने ती पाइपलाइन जिर्ण झाली आहे त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शासनाने जलजिवन मिशन योजने अंतर्गत जवळबंन येथील जलकुंभातुन सोनिजवळा गावांसाठी 4 कोटी 13 लाख रुपये किंमतीची योजना 2023 मध्ये मंजूर करण्यात आली होती व त्यां योजनेचा कालावधी 18 महीने होता .परंतु गुत्तेदार व संबंधित जलजिवन योजनेच्या अधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे आज पर्यंत गावाला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या शिलेदारांनी गावातील महिला , वयोवृद्ध व्यक्तींना 2-2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते हि बाब लक्षात घेऊन. ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपण या समाजाचे देणे लागतो हि भावना मनात ठेवून दिवस रात्र प्रत्येक गल्लीत मोफत पाणी वाटप करणार आहेत आसे बोलताना सांगितले. रानात वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी गावात मात्र नागरिकांचे पाण्या वाचुन हाल होत आहेत, वेळेत जलजिवन मिशन योजना पुर्ण झाली असती तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसती. 5.5 हजार लीटर क्षमतेच्या टँकरमार्फत दररोज प्रत्येक गल्लीत मोफत हजारो लीटर पाणी वाटप करण्यात येणार
असल्याचे मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांनी सांगितले. या टॅंकरने उद्घाटन माजी सरपंच रत्नाकर भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तंटा मुक्ती अध्यक्ष शंकर ससाणे, से स सो संचालक सुनील ससाणे, अर्जुन इंगळे, लहू बोबडे, मा ग्रा. प. सदस्य वैजेनाथ सासणे, सुबराव जोगदंड बाबूखा पठाण, सत्तार शेख मौलाना, दादासाहेब इंगळे, शिरू वैरागे
व गावातील नागरीकांच्या हास्ते नारळ फोडुन उद्घाटन करण्यात आले.