Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कानडी रोड- उमरी रोड संलग्न वार्डात भिषण पाणी टंचाई; न. प. प्रशासन व नगरसेवक भुताने झपाटल्या सारखे शांत; या भागातून मोठे जन आंदोलन उभे रहाणार असल्याची चर्चा;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 1, 2026No Comments2 Mins Read

कानडी रोड- उमरी रोड संलग्न वार्डात भिषण पाणी टंचाई;

न. प. प्रशासन व नगरसेवक भुताने झपाटल्या सारखे शांत;

या भागातून मोठे जन आंदोलन उभे रहाणार असल्याची चर्चा;

केज –

नगरपंचायत मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने केलेला घरकुल घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. महाराष्ट्रामध्ये घरकुल घोटाळ्याची चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र बेफिकीर असून केज शहराला पाण्याचे मोठे संकट असतानाही कसल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत यांना भुताने झपाटल्या सारखे का शांत झाले आहेत. का भ्रष्टाचार व नागरी वस्ती सोडून सुरू असलेल्या कामातून आयता मलिदा मिळत असल्याने बेफिकीर झाले आहेत. अशी चर्चा नागरीक करत असून याभातून लवकरच मोठे जन आंदोलन उभे रहाणार असल्याचे बोलले जात आहे.
केज नगरपंचायत मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचे घोटाळे केले. गोरगरिबांच्या घरकुलांचे आलेले पैसे परस्पर उचलून मलिदा लाटला आणि याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता घोटाळ्याची चौकशी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सुरू आहे. मात्र एकीकडे हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना याची कसलेही सोयरसुतक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. शहरांमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कधी लाईट बिल न भरल्यामुळे तर अनेकदा पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे शहरवासीयांना निर्जळीचा सामना करावा लागतो.यामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार मताच राजकारण करतात आणि अधिकारीही त्याच लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालतात. शहरांमध्ये बहुतांश भागामध्ये अद्यापही नळ योजना पोहोचलेली नाही. सुमारे ४० ते ५० टक्के रहिवाशांना उन्हाळ्यामध्ये विकतच्या पाण्यावर गुजराण करावी लागते. निवडणूक आली की मोठे मोठे आश्वासन दिले जातात आणि काही उमेदवार एखाद दुसरे बोर घेतात आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र त्या बोअरवेल वर ना पाण्याची टाकी किंवा कसलेही नियोजन नसल्यामुळे ते बोअरवेल नादुरुस्त झाले आहेत.
कानडी रोड व उमरी रोड संलग्न वार्डात तर बारा महिने पाण्याची टंचाई जाणवत असते. कधी पाईपलाईन नादुरुस्त, तर या भागातील पाणी पुरवठा करणारे कर्मचारी यांची मनमानी तसेच निवडून आलेले नगरसेवक तर मुग गिळून गप्प आहेत.
ते नेमके कशामुळे अकार्यक्षम झाले आहेत. ते मात्र एक रहस्य आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 90
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 4
Total Users : 149384
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.