Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 23, 2026No Comments1 Min Read

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात;

नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न?

संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

केज-
केज शहरातील कानडी रोडचे काम नगरोथ्थान योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असले तरी या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. विशेषतः प्रशांत नगर परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर कोणताही संरक्षणात्मक कठडा बांधण्यात आलेला नाही. यामुळे नागरिक, पादचारी तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या मार्गावर जवळच मोठी शाळा असून सतत रहदारी असते. पुढे अनेक गावांकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे दिवसभर वर्दळ असते. मात्र नाल्यावर कठडा नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद केज यांच्या संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला लाभ मिळावा म्हणून जाणूनबुजून या त्रुटीकडे दुर्लक्ष केले जात आहे का, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कानडी रोडवरील कामातील त्रुटी तात्काळ दूर करून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी संविधान एकता युवा मंच, कानडी रोड केज लवकरच आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 82
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.