*जनता हाच पक्ष* *माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांचीच चर्चा* माजलगाव- विधानसभा निवडणुक 2024 आज दि. 4 उमेदवारी मागे घेणे व चिन्ह वाटप होणार असून रमेशराव आडसकर यांना राशप पक्षाने डावलून दुसर्याला उमेदवारी दिली. माजलगाव मतदारसंघात याचा सर्वांनाच आश्चर्यचा मोठा धक्का बसला कारण विजयाची खात्री असणारे रमेशराव आडसकर यांना डावल्याने माजलगाव मतदारसंघात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत. तरीही माजलगाव मतदारसंघातील अनेक जेष्ठ नेते, कार्य करते, मतदार यांनी रमेशराव आडसकर यांच्यावर विश्वास दाखवून आम्ही आपल्या सोबत कायम आहेत असा निश्चय केला असल्याने रमेशराव आडसकर यांनी जनता हाच आपला पक्ष ठरवून आपली उमेदवारी दाखल केली. उमेदवारी भरताना सर्व समाजातील जनतेनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
Author: विजयराज आरकडे
मनोज (दादा) जरांगे पाटील केज मतदारसंघातून उमेदवार देणार मा. आ. संगीताताई ठोंबरे का नगराध्यक्षा सिताताई बनसोड होणार जरांगे फॅक्टर मध्ये पास..? केज- मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील हे उमेदवार देणार असल्याचे वृत्त वाहिनीवर प्रसारित झाले आहे. मा. आ. संगीताताई ठोंबरे का नगराध्यक्षा सिताताई बनसोड या दोन्ही पैकी उमेदवार म्हणून रहाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मा. आ. संगीताताई ठोंबरे व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची अनेक वेळा जाऊन भेट घेऊन समर्थन देण्यासाठी विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या परीक्षेत कोण उतिर्ण ठरणार हे लवकरच समजणार आहे. का अन्य कोणी उमेदवार असेल…
*दिवाळी पाढवा निमित्ताने आडसकर प्रेमींची आडस येथे शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी;* *संघर्षात मी रडत बसत नाही तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने लढण्यासाठी मी सदैव तयार असतो* *रमेशराव आडसकर* सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती केज- दिपावली पाडवा निमित्ताने, धारूर, वडवणी, माजलगाव, केज, अंबाजोगाई येथील आडसकर कुटुंबावर प्रेम करणारे जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते, नेते मंडळी, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी आडस येथे स्नेह भेट व फराळा निमित्ताने आडसकर कुटुंबातील सदस्य यांना भेटुन शुभेच्छा दिल्या. हा पारंपरिक कार्यक्रम असल्याने दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी रमेशराव आडसकर यांनी आलेल्या नागरिकांशी संवाद साधताला, स्व. बाबुरावजी (तात्या) आडसकर साहेबापासूंन हा पारंपरिक पाडवा साजरा केला जातो. आडसकर कुटुंबावर…
केज पोलिसांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवांना सोबत दिवाळी साजरी केज पोलीसांनी दाखवली खाकीतली माणुसकी गौतम बचुटे- विधान सभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या सीमा सुरक्षा जवाना सोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत महाजन व पोलिसांनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवाना सोबत दिवाळी साजरी केली. या बाबतची माहिती अशी की केज-२३२ (अ.जा.) राखीव मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा जवानांची एक कंपनी केज आहे ते मागील आठ दिवसा पासून तळ ठोकून आहे. दरम्यान देशसेवा बजावणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकारी हे त्यांच्या कुटुंबा पासून घरा पासून दूर असतात. त्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना…
*आज दिपावली पाडव्याच्या निमित्ताने आडस येथे पारंपरिक स्नेह भेट कार्यक्रमाचे आयोजन* *सर्वांना उपस्थित राहण्याचे रमेशराव आडसकर यांचे आवाहन* प्रतिनिधी- केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा “हाबाडा” हे शब्द आठवतात. दुसरी एक महत्वाची आठवण म्हणजे दिपावलीच्या पाडव्याची आठवण. संपुर्ण केज,अंबाजोगाई व धारुर परिसरातील सर्वच स्तरातील राजकीय , सामाजिक ,शैक्षणिक व पञकारीता या क्षेञातील लोक या दिवशी आडसला येऊन आडसकर साहेबांच्या शुभेच्छा घेत असत. एवढेच नव्हे तर गांवा गांवातील शेतकरी, शेतमजुर हे सुद्धा एकाच पंक्तीला बसुन फराळ करत असत.दिवाळी आणि आडसकर साहेबांचा दिपावली पाडव्याचा मुक्त दरबार हे समीकरणच झाले. तालुक्याच्या नकाशातील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक…
*माजलगाव मतदारसंघात इतिहास घडणार* *अपक्ष आमदार रमेशराव आडसकर ठरणार* माजलगाव- गेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून अल्पशा मताधिक्याने पराभव झालेले रमेशराव आडसकर यांनी निकालानंतर दुसर्या दिवसापासून मतदारसंघात जनसंपर्क वाढवून आपली ओळख घराघरात पोहचवत सामान्य नागरिकांची मने जिंकली आहेत. तांडा, वस्ती, शेती, गाव व शहर आज माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांच्या नावाची चर्चा ऐकू येत आहे. जरी अपक्ष उमेदवार असले तरी माजलगाव मतदारसंघात इतिहास घडणार आहे. अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर आमदार होणार आहे. अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
*स्वामी विवेकानंद शाळेचा चि. आर्यन मुंडे एम. टी. एस. परीक्षेत राज्यातून सर्वप्रथम* *—————————————–* याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, मु.अ. वसंत शितोळे, वर्गशिक्षक, बालकृष्ण चोले, एम.टी.एस. समन्वयक टिंगरे बी. एम. गणेश भालेकर व पालक आदी दिसत आहेत. *—————————————–* : ( केज प्रतिनिधी )* महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ प्राथमिक विभाग ] या शाळेतील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी चि. मुंडे आर्यन अंगद याने ३०० पैकी २७६ गुण मिळवून राज्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे यांच्या उपस्थित आर्यनचा तसेच पालक अंगद मुंडे व सुरेखा मुंडे यांचा शाल,…
मनसेकडून सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे विधानसभा निवडणुक लढवणार; रमेश तात्या गालफाडे यांचा सामाजिक कार्यामुळे मतदारसंघात मोठा जनसंपर्क केज- केज विधानसभा मतदार संघाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे यांनी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज साहेब ठाकरे यांनी रमेश तात्या गालफाडे यांच्याकडे एबी फॉर्म सुपूर्त करून उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश तात्या गालफाडे हे केज मतदारसंघात सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुक जाहीर होताच जनसंपर्क वाढविला होता. यामध्ये मतदारांनी ही निवडणूक आपण लढवावी अशी मागणी केली आहे. रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून मनसेने एक खमका उमेदवार दिल्याचे मतदारसंघात बोलले…
सस्पेन्स संपला केज राखीव मतदारसंघातून दोन प्रमुख पक्षाकडून मा.आ. नमीता मुंदडा, मा.आ.पृथ्वीराज साठे आमने सामने गौतम बचुटे/केज :- केज राखीव विधानसभा मतदार संघातून (राशप) पक्षाचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यासह सपना सुभाष सुरवसे आणि सतिश विठ्ठल वाघमारे या दोन अपक्षासह चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी दिली आहे. केज मतदारसंघात आणखी काही दिग्गज उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळत असून. यामध्ये माजी आ. संगीता ठोंबरे, केज न. प. च्या नगराध्यक्षा सिता बनसोड, सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे हे सर्व व इतरही उमेदवारी दाखल करणार असल्याने येत्या काळात अनेक राजकीय…
केजमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गौतम बचुटे/केज :- केज येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून घरा शेजारी लपवून ठेवलेला ३ लाख ३८ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला. या बाबतची माहिती अशी की, बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, केज येथील अजिजपुरा भागात शेख तौफिक शेख जाकेर याने घरच्या शेजारी असलेल्या बाथरूम पाठीमागील बोळीत ताडपत्री खाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला व तंबाखु पत्ती हे प्रतिबंधित तांबाखुजन्य पदार्थ हे अवैध्यरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी…