*जनता हाच पक्ष*
*माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांचीच चर्चा*
माजलगाव-
विधानसभा निवडणुक 2024 आज दि. 4 उमेदवारी मागे घेणे व चिन्ह वाटप होणार असून रमेशराव आडसकर यांना राशप पक्षाने डावलून दुसर्याला उमेदवारी दिली. माजलगाव मतदारसंघात याचा सर्वांनाच आश्चर्यचा मोठा धक्का बसला कारण विजयाची खात्री असणारे रमेशराव आडसकर यांना डावल्याने माजलगाव मतदारसंघात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत.
तरीही माजलगाव मतदारसंघातील अनेक जेष्ठ नेते, कार्य करते, मतदार यांनी रमेशराव आडसकर यांच्यावर विश्वास दाखवून आम्ही आपल्या सोबत कायम आहेत असा निश्चय केला असल्याने रमेशराव आडसकर यांनी जनता हाच आपला पक्ष ठरवून आपली उमेदवारी दाखल केली. उमेदवारी भरताना सर्व समाजातील जनतेनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा रमेशराव आडसकर यांच्या मागील पाच वर्षापासून जनतेच्या मनात निर्माण झालेले स्थान दाखवून दिले आहे.
त्यांच्या संवाद दौर्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
माजलगाव मतदारसंघात पक्षांच्या उमेदवारां पेक्षा अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्याच नावाची चर्चा जास्त सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
माजलगाव मतदारसंघातील अनेक राजकीय जाणकाराराच्या म्हणण्यानुसार रमेशराव आडसकर हे या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचे चित्र आहे. असे सांगत आहेत.
अपक्ष असल्याने त्यांना मतदारा बरोबरच स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचा पाठिंबा वाढत आहे.
