*माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना मिळाले शेगडी चिन्ह*
*युवानेते रंजितदादा आडसकर यांच्या संवाद दौर्यात तरूण मतदार होतोय आकर्षित*
माजलगाव-
माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले रमेशराव आडसकर यांना गॅस शेगडी चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह ठळक व आकर्षक असल्याने हे मतदाराला सहज ओळखता येणारे आहे.
रमेशराव आडसकर यांनी गेल्या पाच वर्षापासून माजलगाव मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. यामुळे ते शहर, गाव, वस्ती, तांडा येथील नागरीकांच्या घराघरात पोहचले असल्याने त्यांची सर्व मतदारसंघात आपला माणूस म्हणून ओळखले जात आहे.
याच बरोबर युवानेते रंजितदादा आडसकर यांनी वडीलांना विजयी करण्यासाठी व शेगडी चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. त्यांच्या या दौर्याला तरूण मतदार आकर्षित होत असून मतदारसंघात भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
