Author: विजयराज आरकडे

केज राखीव विधान सभेच्या मतदार संघात २१ इच्छुकांनी ४९ नामनिर्देशन पत्र घेतले : मोठी बंडखोरी होणार महावीआ का महायुतीला बसणार फटका..? गौतम बचुटे/केज :- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल पहिल्या दिवशी २१ इच्छुकांनी ४९ नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहेत. त्या मध्ये समाजवादी पार्टी-१, भारतीय जनता पार्टी ४,भारतीय युवा जन एकता पार्टी-४, बहूजन महा पार्टी-४, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)-४, टिपू सुलतान पार्टी-२, शेतकरी कामगार पक्ष-१, वंचीत बहुजन आघाडी-१, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-२, अपक्ष-२५ यांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केले असून अद्याप पर्यंत एकही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर केले नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे…

Read More

*सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलीसांनी करडी नजर* *आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल* गौतम बचुटे/केज :- सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी केज पोलीसांनी एका माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. २० ऑक्टोबर रोजी केज पोलीसांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, एका माथेफिरूने त्याच्या फेसबुक अकाऊंटच्या आयडीवर एका समाजाच्या भावना भडकाविणारी पोस्ट व्हायरल केली आहे. त्याची माहिती गोपनीय शाखेचे पोलीस नाईक मतीन शेख यांनी त्यांचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिली. त्यांच्या आदेशावरून गोपनीय शाखेचे मतीन शेख यांनी…

Read More

स्व. विमलताई मुंदडा यांच्या नंतर मुंदडा कुटुंबाचे केज शहराकडे दुर्लक्ष अनेक प्रश्न जैसे थे..! नागरिकांत चर्चा केज – सर्वात जास्त निधी आणुन आपण मतदारसंघाचा विकास केला आहे. असे ठामपणे आ. नमिताताई मुंदडा व त्यांचे सहकारी सांगत आहेत मात्र सर्व विकासात केज शहराचा विकासाचा जो आलेख उंचावला पाहीजे होता तो जैसे थे आहे. स्व. विमलताई मुंदडा या आमदार व मंत्री पदापर्यंत पोहचल्या त्यांनी केज व तालुक्यात अनेक भरीव कामे केली त्यांची आजपण आठवण येते. मात्र यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघाला नेमके काय मिळाले ? हे मात्र अद्यापही दिसून येत नाही. त्यामुळे विद्यमान आमदार जरी विकास केल्याचा डंका पिटत…

Read More

गुन्हे दाखल होताच एचपीएम कंपनी आली ताळ्यावर टोलनाक्यावरील सर्व अडथळे हटविले गौतम बचुटे/केज :- टोल नाक्यावर मातीचे ढिगारे आणि सिमेंट काँक्रीटचे मोठमोठे तुकडे टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याने भीषण अपघात घडला त्यात एका दोन महिन्याच्या मुलीचा हात धडापासून तुटला होता आणि तुटलेला हात तब्बल अठरा तासाने अपघात स्थळी आढळून आला त्या प्रकरणी पोलिसांनी एचपीएम कंपनीचे मालक मॅनेजर आणि अपघाताला जबाबदार असलेले यंत्रणा यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल होताच तात्काळ टोल नाक्यावरील सर्व अडथळे हटविण्यात आले आहेत. तसेच टोल नाक्यावर सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि प्रकाश योजना करण्यासाठी पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान या पूर्वीचं जर एचपीएम कंपनीने…

Read More

एचपीएम कंपनी आणि  गलथानपणामुळे केजजवळील टोल नाक्यावर दोन अपघात ! अपघाताला जबाबदार असलेल्या एच पी एम कंपनी  गुन्हा दाखल करण्याची मागणी गौतम बचुटे/केज :- केज येथील टोल नाक्यावर रस्त्यावर टाकलेला मातीचा ढिगारा आणि सिमेंट काँक्रिटच्या अवशेषांच्या ढिगाऱ्याला धडकून भीषण अपघात झाला. अपघातात कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या. यात दोन महिने वयाच्या मुलीचा हात तुटला आहे. तर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मुलीची आई, पाच वर्षाची मुलगी, आजी, मुलीचा चुलता हे गाडीतील सहाजण जखमी झाले आहेत. तर त्याच ठिकाणी टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला याच अपघातात नंतर पंधरा मिनिटाच्या अंतराने दुसरा अपघात झाला. त्यात चालक जखमी झाला असून या टोल…

Read More

केज येथे कोजागरी पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न; केज- जैन किराणा स्टोअर्स व रवी मसाले यांच्यातर्फे महीला व पुरुषांची दांडिया, संगीत खुर्ची, असे विविध प्रकारचे आनंददायी स्पर्धा श्री महावीर जैन मंदीर येथे कोजागरी पौर्णिमा निमित्ताने घेण्यात आल्या. या स्पर्धेत केज येथील पुरुष महीला यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामध्ये पहिले पारितोषिक सम्मेद घेवारे, दुसरे पारितोषिक राजेभाऊ काळेगोरे व तिसरे पारितोषिक पुजा देवधारे यांनी मिळवले. यावेळी अस्मिता बापू ऐखंडे यांनी सर्व स्पर्धक व उपस्थित महीला पुरूष यांच्यासाठी विशेष मसाला दुधाचे वाटप केले. या कार्यक्रमाचे आयोजन राहुल भैय्या ऐखंडे यांनी केले होते तर हा आनंददायी उत्सव साजरा करण्यासाठी जितेंद्र देवधारे, रोनक ऐखंडे,…

Read More

*अंगावर पेट्रोल टाकून बायकोने केला नवऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न* *केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल* गौतम बचुटे/केज :- नवऱ्या पासून विभक्त राहात असलेल्या महिलेने प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची खबळजनक घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथील पान मटेरीयलचा व्यावसाय करणाऱ्या इसमाची पत्नी ही मागील एक वर्षा पासुन त्याच्या पासून विभक्त राहत आहे. त्यांच्यात दोघात प्रॉपर्टीचा वाद चालु असून दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास तिचा नवरा हा त्याच्या पान मटेरियलच्या दुकानावर असताना त्याची पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत इतर दोन जण व्यक्ती दुकानावर आले. त्याची पत्नी त्याला म्हणाली…

Read More

*केज येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद* *एकूण ३ लाख ८५ हजार ८१ मतदारा सह ६ तृतीय पंथी आणि ६ हजार २९६ नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क* *४२० मतदान केंद्रा पैकी १८ मतदान केंद्र संवेदनशील* गौतम बचुटे/केज :- केज येथे विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी पत्रकार परिषदे घेवून माहिती दिली. केज विधान सभा निवडणुकीची माहिती देण्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी केक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, केज विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव…

Read More

गंगा माऊली चे बॉयलर शुभारंभ संपन्न (कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस तर डिसेंबर नंतर पगारवाढ) ——————– केज दि.१७ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वास पात्र असलेल्या गंगा माऊली शुगर या कारखान्याचे गुरुवारी दि.१७ रोजी बॉयलर अग्नी प्रतीपदन सोहळा पार पडला यावेळी सुरू होणारा हंगाम देखील किमान ५ लाख उसाचे गाळप होणार असा विश्वास कारखान्याचे संचालक प्रविण मोरे यांनी बोलताना व्यक्त केला. तर कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्याला एक पगार जादा तर येत्या डिसेंबर नंतर कर्मचाऱ्याच्या पगारात देखील वाढ करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रविण मोरे यांनी सांगितले. गंगा माऊली शुगर च्या तृतीय गळीत हंगामाचा बॉयलर आज हभप भगवान…

Read More

विद्यार्थ्यांनी आवडीच्या झेप घ्यावी —डॉ हनुमंत सौदागर विभागीय कुस्ती स्पर्धेत विजयी आरती भांडवलकरचा सत्कार स्वामी विवेकानंद विद्यालयाचे यश केज दि १५(प्रतिनिधी) तालुक्यातील सोनीजवळा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी आरती सुनील भांडवलकर हिने कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर विजय मिळवला व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद विद्यालय व युनिक फाउंडेशन च्यावतीने सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन डॉ हनुमंत सौदागर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रतन भांडवलकर, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर, सचिव शंकर पाखरे, संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव ससाने,मुख्याध्यापक मंगेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ सौदागर म्हणाले…

Read More