डॉ. अंजलीताई घाडगे या अंबाजोगाई येथे पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी गेल्या मात्र यावेळी नेमके काय घडले..?
अंबाजोगाई- प्रतिनिधी
महाविआ चे उमेदवार मा. आ. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी डॉ. अंजलीताई घाडगे या पोहचल्या त्यांनी त्यांच्या सोबत फिरून मतदारांना महाविआ ला मतदान करण्याचे आवाहन केले.
अनेक ठिकाणी डॉ. अंजलीताई घाडगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, ज्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाचा आदेश हेच मान्य समजून साठे यांच्यासाठी प्रचार यंत्रनेत सर्व शक्तीने उतरल्या आहेत.
त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी मतदारसंघात महाविआ च्या नेते, कार्यकर्ते यांची मने जिंकली आहेत. या प्रचारावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांनी अंजलीताई घाडगे यांच्या नावाने घोषणा देत त्यांचा सत्कार करण्याची जोरदार मागणी केली.
यावेळी उमेदवार असणारे पृथ्वीराज साठे यांनी स्वतः त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
यामुळे उपस्थित कार्यकर्ते व नेते यांनी अंजलीताई घाडगे यांना येत्या काळात पक्षात सन्मान मिळाला पाहिजे अशा भावना व्यक्त केली.
