Author: विजयराज आरकडे

समूपदेशन केंद्राचे रेकॉर्ड उघड्यावर गुत्तेदाराने पूर्व कल्पना न देता इमारत पाडल्याने महत्वाचे कागदपत्रे भिजून रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती ! पुरावेच नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ? गौतम बचुटे/केज :- केज येथील जुन्या पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला समुपदेशन केंद्र हे गुत्तेदाराने कोणतीही पूर्वसूचना न पाडल्याने रेकॉर्ड भिजून नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे जर पुरावे नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ! त्यामुळे प्रशासनाने तात्काळ समुपदेशन केंद्रासाठी.जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. बाबतची माहिती अशी की, केज येथील सार्वजनिक बांधकाम.विभागाच्या जागेत जिथे जुने पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात जनविकास सामाजिक संस्थेचे घरगुती हिंसाचार आणि…

Read More

सुभाष गुरव यांचा प्रामाणिकपणा सापडलेले ४६ हजार रु केले परत गौतम बचुटे/केज :- केज येथे रस्त्यावर सापडले ४६ हजार ८०० रू. तीन आठवड्यात नंतर ओळख पटवून ते पोलीस ठाण्यात आणून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलेला परत केल्याची अनोळखी घटना केज घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. २६ ऑगस्ट दुपारी ३:३० वा. च्या सुमारास सुभाष रामभाऊ वाघमारे (गुरव), कोठी यांना केज येथील येवले चहा या दुकाना समोरील रस्त्यावर प्लॅस्टिकच्या पिशवी सापडली. ती त्यांनी उघडून पहिली असता त्यात ४६ हजार ८०० रू असल्याचे निदर्शनास आले. परंतु हे पैसे कुणाचे आहेत ? हे त्यांना माहीत नसल्याने ते कुणाला व कसे…

Read More

*गेल्या पाच वर्षापासून जनतेच्या सुख दुःखात सामिल असलेले रमेशराव आडसकर यांची सर्व सामान्य माणसात सहानुभूतीची लाट* *माजलगाव मतदारसंघातून निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार* वडवणी- *जगदीश गोरे* गेल्या विधानसभा निवडणुकीत रमेशराव आडसकर यांचा अल्पशा मताने पराभव झाला, परंतु हा पराभव विसरून आडसकर यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुख:दुखात सहभागी होऊन जनतेशी आपुलकीचे नाते निर्माण झाले असून आजी आमदार यांच्या पेक्षाही ते मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे असल्याचे चित्र असल्याने मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभुतीची लाट निर्माण झाली असून यावेळी माजलगाव मतदारसंघातून रमेशराव आडसकर यांना निवडून देण्याचा निर्धार मतदाराने केला असल्याचे बोलले जात आहे. लं ———- जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन समस्या जाणून घेऊन त्या…

Read More

*गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे सौ. सारिकाताई सोनवणे आणि डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण* *बक्षीस वितरण कार्यक्रमात रंगले उखाणे !* केज :- खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या धर्मपत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकाताई बजरंग सोनवणे आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौ. डॉ. अंजलीताई घाडगे यांनी महिलांनी गौरी गणपती सजावट आणि आरास करणाऱ्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित केलेल्या उत्कृष्ट देखावे आणि सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी उपस्थित महिलांनी उखाणे सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. केज विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद…

Read More

डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे सौ. सारिकाताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिका ताई बजरंग सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केज विधानसभेच्या संभाव्य उमेदवार डॉ. अंजलीताई घाडगे या मतदारसंघात दौरा करीत असून त्यांना गावोगाव वाढता प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान दि. १३ सप्टेंबर रोजी त्यांनी केज येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अर्धांगिनी आणि जिल्हा परिषद सदस्य सौ. सारिकाताई…

Read More

पप्पू कागदे यांची महायुती मधील रिपाईकडून केज विधानसभा लढण्याची तयारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत कामाला लागण्याचा दिला सल्ला ! गौतम बचुटे/केज :- येत्या विधान सभेसाठी केज राखीव मतदार संघातून रिपाइंचे उमेदवार म्हणून पप्पू कागदे हे देखील तयारी करीत असून त्यांनी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बैठकीत दिले. तसेच केजची जागा महायुतीमध्ये रिपाइंला सोडवून घेण्या संदर्भात ना. रामदास आठवले हे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. जर महायुती मधून ही जागा पप्पू कागदे यांनी लढविली; तर त्याचा फायदा जिल्ह्यात महायुतीला होणार आहे. ना. रामदासजी आठवले हे केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले असल्याने ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा बीड…

Read More

*केज येथील नीटची तयारी करत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार !* *शरीरसंबंधाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला अत्याचार !* *आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या !* *गौतम बचुटे/केज :-* नीटची तयारी करीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. मोबाईलवर पीडितेच्या नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर पुन्हा वारंवार १० ते १२ वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, सुमारे नऊ महिन्या पूर्वी जानेवारी २०२४ मध्ये केज येथील एक लातूर येथे वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटची…

Read More

राजमुद्रा गणेश मंडळाने साकारला आकर्षक देखावा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन ..!  केज- केज येथील पंचायत समिती मैदानावर स्थापन झालेल्या राजमुद्रा गणेश मंडळाने याही वर्षी उत्तराखंड राज्यातील श्री केदारनाथ मंदीराचा आकर्षक देखावा साकारला आहे. त्याचे आज दि. १२ रोजी सायंकाळी ८ वा. बीड जिल्ह्यचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे राजमुद्रा गणेश मंडळाचे प्रमुख अमर भैय्या पाटील यांनी कळवले आहे. गेल्या काही वर्षांपासून केज तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षणाचे केंद्र म्हणून राजमुद्रा गणेश मंडळाने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच बरोबर हिंदू ,मुस्लिम व इतर सर्व धर्माचे लोक आवर्जून येथे येऊन…

Read More

*वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा* *रेश्मा गायकवाड ठरल्या पैठणीच्या मानकरी* केज प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने तुलसी रामायणाचं आयोजन केलेले आहे या तुलसी रामायण कथेचे प्रवक्ते ह.भ.प बाळासाहेब गेंदले महाराज हे लाभले आहेत तर या कथेची आरती केज विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते घेण्यात आली वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा या कार्यक्रमांमध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला होता या खेळामध्ये बकेट बॉल संगीत खुर्ची ग्लास सीडी असे विविध खेळ यामध्ये घेण्यात तर ८ तारखेला लहान मुलांचे खेळ घेण्यात आले . यामध्ये लिंबू चमचा रनिंग असे विविध…

Read More

*संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते साळेगाव येथे गणपतीची आरती* गौतम बचुटे/केज :- संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथील शास्त्रज्ञ डॉ प्रसन्ना राऊत यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील साळेगाव ता के ज येथील गणपतीची आरती करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. के ज येथील डॉ प्रसन्ना राऊत हे शास्त्रज्ञ म्हणून सेवा देत आहेत. डॉ. प्रसन्ना राऊत यांचे वडील हे केज बीड जिल्हा परिषदेच्या पशू संवर्ध विभागात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. तर आई गृहिणी आहे. त्यांचे मामा हे प्रसिद्ध इतिहास संशोधक, साहित्यिक आणि नाट्यकर्मी तथा लेखक डॉ. सतीश साळुंखे आहेत. तसेच चुलते…

Read More