*जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे सुयश*
दि. ८ ऑक्टोबर :
( केज प्रतिनिधी )
सैनिकी विद्यालय बीड या ठिकाणी दि. ५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील दिपाली भीमाशंकर पाटील व ऐश्वर्या बप्पाजी घुले या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, क्रीडा शिक्षक श्रीकिसन नेहरकर, प्रबोधकांत समुद्रे तसेच शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये १४ वर्ष वयोगटातून दिपाली भिमाशंकर पाटील हिने गोळा फेक मध्ये जिल्हयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच १७ वर्षे वयोगटातून ऐश्वर्या बप्पाजी घुले हिने गोळा फेक मध्ये जिल्हयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
वरील यशस्वी खेळाडू शाळेतील क्रीडा शिक्षक श्रीकिशन नेहरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील दोन्ही खेळाडू दि. १० ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी गारखेडा क्रीडा संकुल संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेत बीड जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, सचिव गिन्यानदेव गदळे, संचालक फजीलोद्दीन काजी, नारायण अण्णा अंधारे, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
