Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यातील शिक्षक-शिक्षिकांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” चे वितरण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 4, 2024No Comments2 Mins Read

केज तालुक्यातील
शिक्षक-शिक्षिकांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” चे वितरण

केज: “रोटरी इंटरनॅशनल” ही जगातील दोनशेहून अधिक देशात मैत्री, समाजसेवा व इतर अत्यावश्यक उपक्रमासह काम करणारी सर्वात मोठी व प्रतिष्ठित अशी सामाजिक संस्था असून आपण या संस्थेचे सदस्य होऊन मानवी कल्याणासाठी हातभार लावा असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल रो डॉ सुरेश साबू यांनी केज रोटरीच्या ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ च्या वितरण प्रसंगी केले. यावेळी सहप्रांतपाल रो विवेक गंगणे, नगराध्यक्षा तथा केज रोटरीच्या माजी अध्यक्षा सीता बनसोड, केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे, फर्स्ट लेडी निर्मलादेवी रोटरी क्लब ऑफ केज चे विद्यमान अध्यक्ष रो प्रकाश कामाजी व सचिव रो अनंत तरकसबंद इत्यादींची उपस्थिती होती.
केज रोटरीच्या वतीने केज तालुक्यातील दहा शिक्षक-शिक्षिकानां ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अर्थात राष्ट्रनिर्माते शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रांतपाल डॉ साबू बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरात रोटरी द्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रमुख उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. केज रोटरीच्या आजपर्यंतच्या कार्याची त्यांनी प्रसंशा केली. केजवासीयांनी जगभरात कार्य करणाऱ्या रोटरी मध्ये स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. यावर्षीच्या केज रोटरी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड 2024’ चे मानकरी 1. संदेश अंबादास फावडे 2. अशोक अनंतराव जोगदंड 3. मुल्ला समद बशीर साब 4. अनंत नानाभाऊ जाधवर 5. श्रीकृष्ण लक्ष्मणराव सिरसट 6. प्रशांत लक्ष्मणराव जाधव 7. गीता जीवराज अंडिल 8. वैशाली शंकरराव धाडवे 9. वैशाली कारभारी बोराडे 10. स्वाती वामनराव समुद्रे हे ठरले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षकांच्या वतीने गीताताई अंडील व संदेश फावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रोटरीचे पुरस्कार खूपच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भोसले यांनी केले तर आभार सचिव अनंत तरकसबंद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी रो विकास मिरगणे, प्रवीण देशपांडे, सूर्यकांत चवरे, अरुण अंजाण, बापूराव सिंगण, प्रा डॉ बीजे हिरवे, श्रीराम देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

विजयराज आरकडे

Post Views: 57
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 2
Total Users : 149372
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.