लग्न करण्याचे आमिष दाखवून ३० वर्षाच्या महीलेवर अत्याचार सोन्याचे दागिने व नगदी ५० हजार रु. सह दीड लाख रु. चा ऐवजही लांबविला ! गौतम बचुटे/केज :- येथील एका ३० वर्षीय महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी, केज येथे राहत असलेल्या आरोपीने एका वस्तीवर राहात असलेल्या तीस वर्षीय महिलेवर तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून ती एकटी घरी असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर त्याच्या केज येथील घरी आणि पुणे जिल्ह्यातील पिरंगुट ता. मुळशी येथे त्याच्या भाड्याच्या घरात मागील एक महिन्या पासून त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना घडली…
Author: विजयराज आरकडे
सर्व समाजाने मला यावेळी बहीण म्हणून स्विकारावे- डॉ. अंजलीताई घाडगे यांची नागरीकांना साद संपर्क दौर्यातून डॉ. अंजलीताई घाडगे मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरा-घरात व मना-मनात केज- विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून याच पार्श्वभूमीवर डॉ. अंजलीताई घाडगे यांनी केज मतदारसंघातून संपर्क दौरा नियोजनबद्ध सुरू केला असून शरदचंद्र पवार साहेब यांच्या (तुतारी) पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत मला एक बहीण म्हणून म्हणून सर्वांनी स्वीकारावे अशी भावनिक साद घातली आहे. त्यांच्या या संपर्क दौर्याला मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संपर्क दौर्यातून डॉ. अंजलीताई घाडगे मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरा-घरात व मना-मनात पोहचल्या आहेत. याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत होईल असे…
“केजच्या स्मार्ट श्रीमती” विजेत्या रेश्मा बांगर तर उपविजेत्या सुनीता राऊत केज: केज रोटरी तर्फे दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त घेतल्या जाणाऱ्या “केज स्मार्ट श्रीमती” स्पर्धेत केजच्या रेश्मा जीवन बांगर यांनी प्रथम क्रमांक मिळवून “केज स्मार्ट श्रीमती” बनण्याचा बहुमान मिळवला तर सुनीता संतोष राऊत यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज डायरेक्टर रवींद्र बनकर, रो किशोर दाताळ, केज रोटरी अध्यक्ष प्रकाश कामाजी, हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, अरुण अंजाण, दादाराव जमाले पाटील सुशील टोपे व नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. रोटरी क्लब ऑफ केज आणि भवानी माता उत्सव समितीच्या वतीने ही स्पर्धा मंगळवारी भवानी मंदिर प्रांगणात पार पडली. या स्पर्धेत विविध…
*आरोग्य खात्यात नोकरी लावण्याच्या आमिषाने २८ लाख ६५ हजार घेवून फसवणूक !* *सहा जणांना लावला ठकसेनाने चुना* गौतम बचुटे/केज (बीड) :- आरोग्य विभाग नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने सहा जणांची फसवणूक करून त्यांच्या कडून २८ लाख ६५ हजार रु. उकळले असल्याचा खबळजनक प्रकार उघडकीस आला असून जर आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रू. ची माया जमविली असल्याच्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या ठकसेनाला पोलीस अधीक्षकांनी बेड्या ठोकून त्याचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथील भगवान बिभीषन गाडवे हे चहाचे हॉटेल चालवितात. दि. २० ऑक्टोबर २०२२…
एका मुकबधीर महिलेवर लैंगिक अत्याचार; केज तालुक्यातील घटना गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा केज तालुक्यात एका जन्मात: मुकबधीर असलेल्या एका ४३ वर्षीय दिव्यांग महिलेवर तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून गावातील एकाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी व चीड निर्माण करणारी घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात एक जन्मतः मूक-बधीर असलेली महिला आहे. तिचे लग्न झालेली असून ती माहेरीच आई वडिलांकडे राहत आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी तिचे आई वडील हे दुसऱ्याच्या शेतात मजुरीने सोयाबीनची कापणी करण्यासाठी तिला घरी ठेवून गेले होते. ती मुकबधीर महिला एकटीच घरी…
*जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे सुयश* दि. ८ ऑक्टोबर : ( केज प्रतिनिधी ) सैनिकी विद्यालय बीड या ठिकाणी दि. ५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील दिपाली भीमाशंकर पाटील व ऐश्वर्या बप्पाजी घुले या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, क्रीडा शिक्षक श्रीकिसन नेहरकर, प्रबोधकांत समुद्रे तसेच शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्ष वयोगटातून दिपाली भिमाशंकर पाटील हिने गोळा फेक मध्ये जिल्हयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान…
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचे यश केज (प्रतिनिधी ) तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग दहावीची विद्यार्थिनी बालिका प्रेमदास देशमुख ही हातोडा फेक स्पर्धेत मुलीत प्रथम आलेली आहे. त्याचबरोबर वर्ग नववीतील विद्यार्थी जयेश शंकर पाईकराव हा मुलात हातोडा फेक स्पर्धेत प्रथम आलेला आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी बालिका प्रेमदास देशमुख आणि जयेश शंकर पाईकराव आणि मार्गदर्शक वैभव खाडे सर, सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक गणपत पांचाळ सर यांचे संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे, कोषाध्यक्ष मुरलीधर काकडे आणि सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण,…
माजलगाव घटनेचा खा.सौ. रजनीताई पाटील यांच्याकडून निषेध व्यक्त केज- बदलापुरची घटना अद्याप विसरली नाही तोवर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका साडे पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार हा अतिशय किळसवाणा व नीच पणाचा कहर आहे. शिक्षण, शिक्षक व शैक्षणिक परिसर हे पवित्र मानले जातात मात्र सद्या हे उलट होताना दिसत आहे. एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना देऊन महिलांना खुश करण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात राज्यातील बहिणीवर किती अत्याचार होत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून अत्याचाराच्या किती घटना घडत आहेत हे देखील सरकारमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी चिंतन करावे. महाराष्ट्रात दररोज अशा अनेक घटना समोर येत असताना राज्य सरकार मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत…
केज तालुक्यातील शिक्षक-शिक्षिकांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” चे वितरण केज: “रोटरी इंटरनॅशनल” ही जगातील दोनशेहून अधिक देशात मैत्री, समाजसेवा व इतर अत्यावश्यक उपक्रमासह काम करणारी सर्वात मोठी व प्रतिष्ठित अशी सामाजिक संस्था असून आपण या संस्थेचे सदस्य होऊन मानवी कल्याणासाठी हातभार लावा असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल रो डॉ सुरेश साबू यांनी केज रोटरीच्या ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ च्या वितरण प्रसंगी केले. यावेळी सहप्रांतपाल रो विवेक गंगणे, नगराध्यक्षा तथा केज रोटरीच्या माजी अध्यक्षा सीता बनसोड, केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे, फर्स्ट लेडी निर्मलादेवी रोटरी क्लब ऑफ केज चे विद्यमान अध्यक्ष रो प्रकाश कामाजी व सचिव रो अनंत तरकसबंद इत्यादींची उपस्थिती…
केज नवरात्र महोत्सवात रोटरीचे सांस्कृतिक कार्यक्रम केज : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नवरात्र महोत्सवात रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने “होम मिनिस्टर” आणि डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला व कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केज रोटरीच्या वतींने अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद व संस्थापक अध्यक्ष हनुनंत भोसले यांनी केले आहे. येत्या मंगळवार दि 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता “होम मिनिस्टर” कार्यक्रम पार पडणार असून यासाठी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येईल. मुलामुलींसाठी “डान्स स्पर्धा” गुरुवार दि 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. डान्स स्पर्धेसाठी बुधवार दि 9…