जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे- प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे शिक्षण, आरोग्य व शिस्त ही नाळवंडीकर गुरुजींची त्रिसूत्रे होती – जी. बी. गदळे सोनवणे आश्रुबा, शिनगारे सुरेश, पाळवदे बाबुराव, मोटे दिपा, राऊत सुनिल हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी. केज प्रतिनिधी: दि. ६ सप्टेंबर- आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात मानवी मूल्ये मागे पडत चालली आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, दयाळूपणा, आदर, कृतज्ञता आणि सहानुभूती यांसारख्या मूल्यांचे धडे देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते समाजात वावरताना जबाबदारीने वागतील. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी…
Author: विजयराज आरकडे
उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार केज दि ५(प्रतिनिधी) उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना केज तालुका ग्राम सखींच्या वतीने केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील पंधरा दिवस किंवा शासन निर्णय वेळेपर्यंत ऑनलाईन काम बंद करत केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देण्यास पन्नास हून अधिक ग्राम सखींची उपस्थिती होती यावेळी निवेदनावर स्वाक्षरी करून तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ग्रामसखींना अपंगत्व मृत्युमुखी दहा…
शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या ‘डॉन’ला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल केज: दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरून नेताना पकडल्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःला डॉन म्हणवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईताला नागरिकांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर जबरी चोरी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाळासाहेब निवृत्ती ठोंबरे (वय ३५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. एकुरका, ता. केज, जि. बीड, सध्या रा. मधुबन हॉटेलच्या मागे, केज) हे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कीर्ती जनरल स्टोअर समोर आपली मोटारसायकल (क्रमांक एमएच ४४ वाय ७३६९) उभी करून…
हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती; केज, दि. २ सप्टेंबर : केज शहरातील कानडी रोडवरून समर्थ नगरला जोडणाऱ्या नाल्याचे काम सुरू असतानाच नाला खचल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित गुत्तेदाराच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करत यासंदर्भात वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जनविकास आघाडीचे नेते हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व गुत्तेदार यांना कामाच्या दर्जाबाबत धारेवर धरत, नाल्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या…
कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम केज दि १(प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयीन स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि डिझाईन थिंकिंग यासारख्या आधुनिक विषयाचा एकात्मिक अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास शैक्षणिक प्रक्रिया पार पाडण्यास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मदत होईल याविषयी प्रोफेसर मनसाफ आलम यांनी व्याख्यानातून मत व्यक्त केले. २७ रोजी बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड सामंजस करारा अंतर्गत श्रीमती केशरबाई सोनाजीराव शिरसागर महाविद्यालय, बीड, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव, कै. शंकरराव गुट्टे…
अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट; अंबाजोगाई- प्रतिनिधी अंबाजोगाईमध्ये शनिवारी सकाळी मॅरेथॉनची तयारी सुरू होती. कुणी वॉर्मअप करत होतं, तर कुणी बुटाच्या नाड्या आवळत शिट्टीची वाट पाहत होतं. त्याचवेळी साडी नेसलेली 47 वर्षीय रमाबाई रणवीर तिथे आल्या. शिट्टी वाजताच त्या धावू लागल्या आणि त्यांच्या वेगाने उपस्थितांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या परिसरात रमाबाईंच्या धावण्याला टाळ्यांचा कडकडाट मिळाला. सुरुवातीला तरुण मुलं-मुली पुढे निघून गेले, मात्र रमाबाईंची धाव थांबली नाही. पायातील चप्पल वारंवार सटकत असल्याने त्यांनी अखेर चप्पल हातात घेतली आणि अनवाणी साडी सांभाळत धावायला सुरुवात केली. पावसामुळे गार झालेला रस्ता आणि वाटेतले…
कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’ केज प्रतिनिधी : केज शहरातील महत्त्वाच्या कानडी रोडच्या सुरू असलेल्या रस्ता व पुलाच्या कामावरून व्यापारी तसेच वाहनधारक आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप या रस्त्याची स्थिती समाधानकारक झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 2012-13 च्या काळात तत्कालीन दिवंगत उपअभियंता सराफ यांच्या कार्यकाळात सी.बी. बिक्कड यांनी कानडी रोडवरील पूल व रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या या कामातील पूल सध्याच्या विकासकामासाठी फोडताना विद्यमान कंत्राटदार यश कन्स्ट्रक्शन यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले जाते. मात्र…
कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन; आप्तेष्ट व परिचितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली केज : कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना देवीदासराव चाटे यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाटे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. कल्पना चाटे या आपल्या प्रेमळ, मनमिळावू व आपुलकीच्या स्वभावामुळे सर्व परिचितांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली असून, त्यांच्या आप्तेष्टांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पती कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे, मुलगी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, ॲड. अमिता चाटे, मुलगा ॲड. संकेत चाटे, सून जावई व नातवंडे असा परिवार…
केज येथे शांतता समितीची बैठक सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणारा विरुद्ध कठोर कारवाई करणार — पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ केजचे पावित्र्य आणि सलोखा राखण्यास केजकर समर्थ आहेत — अशोक सोनवणे गौतम बचुटे, केज:- केज येथील हिंदू आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजासाहब यांच्या उरुसच्या पार्श्वभूमीवर केज येथे शांतताता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सर्व सण उत्सव आणि जयंत्या या सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून साजरे करण्याचे आवाहन केले. तर काही असामाजिक घटक जर सार्वजनिक शांतता आणि कायदा बिघडविण्याचे काम करीत असतील तर पोलिस प्रशासन त्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा दिला. केजचे पावित्र्य…