न्यु इंटेल कॉम्प्युटर्स मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केज- येथील नामांकित न्यु इंटेल कॉम्प्युटर्स याठिकाणी ८ मार्च रविवारी सकाळी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याविषयी सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील सुप्रसिद्ध व संगणक शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम नियमित राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी व महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून काही यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. व नंतर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर च्या प्राचार्या सौ.शैलाताई इंगळे मॅडम…
Author: विजयराज आरकडे
फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्ती ची अपयशातून यशाची कहाणी प्रेरणादायी- तो चाळीसपेक्षा जास्त वेळा सिलेक्शनसाठी गेला. एकही ठिकाणी सिलेक्ट झाला नाही. कधी गोलंदाजीत अपयशी ठरल्यावर फलंदाज बनण्याचा विचार केला, तर कधी पराभव स्वीकारून यष्टिरक्षक (विकेटकीपर) होण्याचा निर्णय घेतला. जीवन त्याला काय बनवू इच्छित होतं, हेच समजत नव्हतं. अखेर, एका दिवशी स्वप्नांच्या खेळपट्टीवर बोल्ड झाल्यावर त्याने निश्चय केला की आता कायमस्वरूपी क्रिकेट सोडून अभ्यास करायचा. पाच वर्ष आर्किटेक्चरची पदवी घेतली, त्यानंतर तीन वर्षे नोकरी केली. पण नोकरीतही मन रमले नाही. शेवटी वडिलांना फोन करून म्हणाला, “पप्पा, ही नोकरी माझ्याकडून होत नाही. फक्त एकदा परत प्रयत्न करू द्या. यावेळी अपयशी झालो, तर…
महिला सक्षमीकरणासाठी येडेश्वरी फांऊडेशन काम करेल: खा.सोनवणे केजमध्ये येडेश्वरी फाऊंडेशनच्या कार्यालयाचे महिला दिनी उद्घाटन, कतृर्त्ववान महिलांचा केला सन्मान केज: शासनाने लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. परंतु त्यातून महिला सक्षम होणार नाहीत. तर महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मीती करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून आपण येडेश्वरी फांऊडेशनच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मीती करून देण्याचे काम करणार आहोत. सुरूवातीला केज आणि आगामी काळात जिल्हाभरात हा प्रयोग करू, असे प्रतिपादन खा.बजरंग सोनवणे यांनी केले. ८ मार्च जागतीक महिला दिनानिमीत्त केजमध्ये येडेश्वरी फांऊडेशन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खा.बरजंर सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कतृर्त्ववान महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संजीवनी देशमुख, पंचायत समितीचे…
तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिला परितक्त्या महिलेला न्याय ! गौतम बचुटे/केज :- तारीख-पे-तारीख होत असल्याने वैतागून एका परित्यक्ता महिलेच्या विधवा आईच्या नावावरील शेत जमीन ही नवऱ्याने सवतीच्या मुलाच्या नावे एका बनावट १० रू. किंमतीचे बाँड वरून बनावट बक्षीस-पत्राच्या आधारे केल्याचा फेर रद्द करून तहसीलदार यांनी तात्काळ करून त्या पीडित महिलेला दिलेला शब्द खरा केला आणि ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना आदेश देताच अवघ्या काही तासात त्या महिलेला न्याय मिळवून दिला. या बद्दल तहसीलदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरपगाव ता. केज येथील दीपा भानासुर देशमुख यांचा विवाह गावातील रवींद्र श्रीहरी भोसले यांच्याशी झाला होता. लग्ना नंतर त्यांना…
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा संतोष देशमुखांच्या समोर ‘शहीद’ शब्द लागावा – हर्षवर्धन सपकाळ गौतम बचुटे/केज :- संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना पदयात्रा काढण्यात आली असे सांगून भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. तसेच भाजप हा खोके बोके आणि आक्का यांना जन्म देणारा कारखाना असल्याची सणसणीत टीका त्यांनी भाजपवर केली. संतोष देशमुख…
गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघाचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला नांदेड- दि . 8 मार्च 2025 जागतिक महिला दिना निमित्त गोविंदेश्वर प्रा. शाळा तरोडा बु नांदेड. येथे माता पालक महिलांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवाद करण्यात आले.निपूण भारत अभियाना अंतर्गत निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली इयत्ता पाहिली ते सातवीच्या च्या सर्व विद्यार्थ्याच्या मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला शिक्षिका सौ. संध्या सिंदगीकर होते. त्याच बरोबर माता पालक संघांचे सर्व महिला पदाधिकारी सौ. सविता लिंगायत सीमा गायकवाड सुरेखा इंगोले सविता आंबटवार रमावती बघेल अनुसया मोरे जनाबाई…
TOT शिक्षक प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्याचा समारोप केज : प्रातिनिधी आज दिनांक ७ मार्च रोजी केज तालुक्यातील भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित TOTअर्थात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या चौथ्या टप्प्याचा समारोप झाला . सदरील प्रशिक्षण हे ३ मार्च ते ७ मार्च पर्यंत चालले. या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ३०० पेक्षा जास्त शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला होता. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात…
मराठा सेवा संघाची केज येथे बैठक विविध पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर केज – मराठा सेवा संघाची बैठक केज येथे सोमवार रोजी संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे विष्णू तपसे, हनुमंत घाडगे हनुमंत भोसले, गोविंद सपाटे, राधाताई सपकाळ,हिराबाई शेळके ,गोविंद शिनगारे आदींची उपस्थिती होती येणाऱ्या कालावधीत होणारी जिजाऊ प्रबोधन यात्रा विषयी चर्चा करुन या प्रबोधन यात्रेचे विविध ठिकाणी तालुक्यामध्ये विविध प्रकारे स्वागत, कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. मराठा सेवा संघ शिवधर्म संस्कार विधी नामदेव तुकोबा विचार कृती प्रणित,…
शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार जाहीर केज- केज येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षा सौ. शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार येत्या १६ मार्चला पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. सौ. शितलताई लांडगे ह्या सर्वसामान्य कुटुंबातील असून त्या गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक विधवा, परितक्ता, गोरगरीब महिलांचे शिक्षण व वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण आणि त्याच बरोबर अनेक महिलांचे उद्योग व्यवसाय उभे करून दिलेले आहेत. त्यांना कित्तेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी त्या…
मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही योग्य कारवाई होत नाही- मनोज जरांगे पाटील गौतम बचुटे/केज :- देशमुख कुटुंबाला मुख्य मंत्र्यांनी एकही गुन्हेगार सुटणार आणि असा शब्द दिलेला असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. किंवा त्यांना सहआरोपी केले जात नाही. यावर मनोज दादा जरांगे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते मस्साजोग येथे गावकरी व स्व. संतोष देशमुख कुटुंबाच्या अन्नत्याग आंदोलनास भेट देण्यासाठी दि. २५ रोजी आले होते. तसेच जर मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कमी पडत असतील; तर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या आंदोलनात सहभागी होवून केंद्राकडे सखोल तपासाची मागणी करावी. अशी…