संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर घटनेतील आरोपींना फाशी व्हायला हवी — गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम
या पुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
गौतम बचुटे/केज
संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्दतीने हत्या करण्यात आली. त्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला हवी असे माझे वैक्तीक मत असून जर या हत्या प्रकरणातील कोणत्याही कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर ते गैर असून त्याची सुद्धा चौकशी केली जाईल तसेच या सर्व प्रकरणाकडे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे या सर्व प्रकरणात कडे लक्ष ठेवून आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे त्यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी असताना त्यांची पोलीस अधिकाऱ्यां सोबतची उठबस हे आक्षेपार्ह असल्याचे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आणि अशा अधिकाऱ्यांचे फक्त निलंबन करून भागनार नाही तर त्यांना कायमचे बडतर्फ करायला हवे. असा सज्जड दम दिला.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दि. ४ एप्रिल रोजी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, बाजीराव चव्हाण, विधान सभा प्रमुख दादासाहेब ससाणे, तालुका अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किसन कदम यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणाचा कळस असून अशा गुन्हेगारांना आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी त्यांचे वैक्तिक मत असल्याचे सांगितले. तर या वेळी गावकऱ्यांनी त्यांना संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्या नंतर गावकरी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावेळी पोलिसांनी त्यांना चुकीची माहिती दिली. तत्कालीन पोलीस आणि पोलीस अधिकारी यांचे गुन्हेगारांशी सबंध होते. यातील आरोपी यांच्यावर पूर्वी खंडणी, अपहरण व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना आणि ते फरार असताना त्यांची केज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी कायम संपर्क होता. हे त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत असून वाल्मीक कराडला कारागृहात कारागृह प्रशासन हे व्हिआयपी ट्रीटमेंट देवून त्याची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी बोलताना ना कदम म्हणाले की,मी ना. एकनाथ शिंदे यांचा संदेश घेवून आलेलो आहे. यातील मुख्य आरोपींना बीड करागृहा ऐवजी इतरत्र स्थलांतरित करण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे ते चर्चा करणार आहेत. तसेच पूर्वीच्या पोलीस अधिकाऱ्यांचे या प्रकरणी पूर्णतः अपयश आहे असे म्हणता येणार नाही परंतु त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे हे प्रकरण घडले असे ताशेरे त्यांनी ओढले. तसेच या प्रकरणातील कारवाई झालेल्या पोलीस अधिकारी यांची देहबोली ही पश्र्चताप किंवा अपराधीपणाची नसल्याचे जाणवते म्हणून त्यांच्यावर देखील कठोर कर्यावाई करण्यात यावी त्या बाबत त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांना निर्देश दिले आहेत. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सज्जड कठोर भूमिकेमुळे आता पोलीस प्रशासन काय कारवाई.करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
