शाहीर तुकाराम सुवर्णकार यांना युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार
केज –
तालुक्यातील बनसारोळा येथील भूमिपुत्र शाहीर तुकाराम सूर्यकांत सुवर्णकार
यांना अखिल भारतीय सोनार समाज प्रतिष्ठान ,अंबाजोगाई
यांच्या कडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार २०२५ चा युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तुकाराम सुवर्णकार महाराज हे परिसरात अनेक वर्षापासून शाहीर म्हणून परिचित आहेत गायन ,जनजागृती कलाक्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना युवा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित, निवड समितीचे राजेंद्र पारखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.