रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न !
केज-
केज तालुका रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने मुस्लिमधर्मीय बांधव यांच्या पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी मुस्लिम धर्मीय बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजाच्या उपवासा निमित्त दि. २९ मार्च रोजी लव्हुरी येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्याच सोबत लव्हुरी येथे उभारलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन देखील करण्यात आले. दिपक कांबळे यांच्या रोजा इफ्तार पार्टी प्रसंगी जमियत उलेमा -ए -हिंद केज तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य मेहबूब सय्यद, चेअरमन वाहेद भाई , शयमुद शेख, नबीसर, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, आयटी सेल प्रमुख सुरज काळे, हरिश गायकवाड, विनोद गायकवाड, रोहित कांबळे, रवी गायसमुद्रे, रंजित कांबळे, बाळासाहेब कांबळे, किशोर कांबळे यांच्यासह परिसरातील सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.
