वसंत प्रा. शाळेचा विद्यार्थी अवधूत राऊत याचे एम.टी.एस.परिक्षेत घवघवीत यश
केज-
शहरातील वसंत प्राथमिक शाळा केज येथील इयत्ता पहीलीत शिकणारा विद्यार्थी अवधूत गोविंद राऊत यांने एम. टी. एस. या स्पर्धा परिक्षेत गोल्ड मेडल पटकावले आहे.
त्याने पहिल्याच स्पर्धा परिक्षेत 150/126 गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका, हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनी अवधूत राऊत याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पालक वर्गातूनही अभिनंदन करण्यात येत आहे.