रामनवमी निमित्ताने सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धा संपन्न
केज-
रामनवमी निमित्ताने कानडी रोड येथील हनुमान मंदीर (वकीलवाडी) येथे सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आला होते.
या स्पर्धेत लहान मुला मुलींना मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
स्पर्धा संपल्यानंतर रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा लाभही परिसरातील भाविकांनी घेतला.
लहान विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवाशिष रमेशराव आडसकर, गायकवाड, राऊत,कदम व सर्व मित्र परिवारने परिश्रम घेतले.
