सुरेखा लोंढे -बचुटे यांना शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर बालासाहेब बचुटे: केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रातील नागझरी शाळेच्या सह शिक्षिका श्रीमती सुरेखा साहेबराव लोंढे -बचुटे यांना शिक्षकांची पतसंस्था (म.)केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. लव्हुरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागझरी येथील शिक्षिका सुरेखा लोंढे-बचुटे यांची शिक्षकांची पतसंस्था (म.) केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.शिक्षकांची पतसंस्था (म.) केज यांच्या विद्यमाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सुरेखा लोंढे-बचुटे यांनी या पूर्वी साळेगाव केंद्रातील सातेफळ आणि माळेगाव येथील शाळेत अध्यापनाचे काम केले आहे.सध्या त्या नागझरी येथील शाळेत कार्यरत आहेत.त्यांची अध्यपनाप्रती निष्ठा…
Author: विजयराज आरकडे
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी पाठवले राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र बीड/प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, अंतरवाली सराटीत (दि.17) पासून आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यामुळे राज्यातील कोटी मराठ्यांचा आवाज असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशा मागणीचे पत्र बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी (दि.21)दिले आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची खा.बजरंग सोनवणे यांनी अंतरवाली सराटीत जावून भेट घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून उपोषण…
दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ उभारली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती गौतम बचुटे/केज :- तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबाने त्याच्या स्मरणार्थ शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून त्याची स्मृती कायम ठेवली आहे. केज तालुक्यातील के ज येथील २५ वर्षाचा युवक निपुण भालेराव हा माहिती व तंत्रज्ञान विषयात बी-टेक्च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील प्रा. धनंजय भालेराव हे दहिफळ वडमाउली येथील गदळे यांच्या महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर आई दैवशाला सिरसट या गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणू कार्यरत आहेत. सन २०२३ मध्ये चि. निपुण भालेराव यांच्या मोटार सायकलचा बीडच्या घाटात अपघात झाला…
*डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड* पुणे / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले…
*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहिर* रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण केज ( प्रतिनिधी) केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके यांची निवड झालेली आहे. आदर्श शेतकरी धर्मराज थोरात यांची शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गरड मंगल…
निश्चयाचे बळ मिळते फळ ——————————– नुकत्याच झालेल्या Mpsc परीक्षेत आमच्या वसंत प्राथमिक शाळा केज व माझा विद्यार्थी कु शैलेश नागनाथ मुंडे समर्थ नगर केज येथील रहिवासी हा धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये सीनियर अकाउंटंट म्हणून नोकरी मिळाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विशेष बाब म्हणजे लहानपणापासून अतिशय चिकाटी व अभ्यास वृत्ती होती लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले होते घरातील सर्व जबाबदारी आईवर येऊन ठेपलेली होती तरीपण आईने न डगमगता आपल्या मुलांवर चांगले सुसंस्कार व शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि मुलांचे मुलींचे चांगल्या प्रकारे शिक्षण त्यांना दिले गेले या मुलाने आपल्या आईला साथ देत घरातील जबाबदाऱ्या सांभाळात आपला अभ्यास…
*दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती !* गौतम बचुटे/केज :- पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात घडला आहे. सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसुन तिच्या मामाचा मुलगाच आहे. केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने दि. १५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्या नंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती…
*प्रत्येक वेळी निवडणूकीत मुंदडा कुटुंबीय स्व. ताईच्या नावाने जनतेला भावनीक करून निवडून येते* *पुन्हा पाच वर्षे धनचोखो टिम फायदा घेते* केज- केज मतदारसंघातून स्व. विमलताई मुंदडा यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री पदावर विराजमान होत अनेक विकास्मतक योजना राबविल्या आहेत. मात्र स्व. विमलताई यांच्या निधनानंतर मुंदडा कुटुंबीय त्यांच्या नावाने व त्यांच्या कामाची आठवण करून देऊन निवडणूक लढवतात मात्र त्यांच्या सारखी जनतेत आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी होत नसल्याचे बोलले जात असून. निवडून आल्यानंतर मतदारसंघात एक धनचोखो टिम सक्रिय होते अशी चर्चा रंगु लागली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत धनचोखो टिममुळे मुंदडा यांना फायदा होईल का नुकसान हे…
समूपदेशन केंद्राचे रेकॉर्ड उघड्यावर गुत्तेदाराने पूर्व कल्पना न देता इमारत पाडल्याने महत्वाचे कागदपत्रे भिजून रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती ! पुरावेच नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ? गौतम बचुटे/केज :- केज येथील जुन्या पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला समुपदेशन केंद्र हे गुत्तेदाराने कोणतीही पूर्वसूचना न पाडल्याने रेकॉर्ड भिजून नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे जर पुरावे नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ! त्यामुळे प्रशासनाने तात्काळ समुपदेशन केंद्रासाठी.जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. बाबतची माहिती अशी की, केज येथील सार्वजनिक बांधकाम.विभागाच्या जागेत जिथे जुने पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात जनविकास सामाजिक संस्थेचे घरगुती हिंसाचार आणि…
सुभाष गुरव यांचा प्रामाणिकपणा सापडलेले ४६ हजार रु केले परत गौतम बचुटे/केज :- केज येथे रस्त्यावर सापडले ४६ हजार ८०० रू. तीन आठवड्यात नंतर ओळख पटवून ते पोलीस ठाण्यात आणून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलेला परत केल्याची अनोळखी घटना केज घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. २६ ऑगस्ट दुपारी ३:३० वा. च्या सुमारास सुभाष रामभाऊ वाघमारे (गुरव), कोठी यांना केज येथील येवले चहा या दुकाना समोरील रस्त्यावर प्लॅस्टिकच्या पिशवी सापडली. ती त्यांनी उघडून पहिली असता त्यात ४६ हजार ८०० रू असल्याचे निदर्शनास आले. परंतु हे पैसे कुणाचे आहेत ? हे त्यांना माहीत नसल्याने ते कुणाला व कसे…