केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात केज- केज येथील बीड रोडवर असणारा प्रसिद्ध यशंवत धाबा मालक रामचंद्र घुले रा. टाकळी यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. तर केज येथील एका बीअर बारचे मालक व अन्य एक जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाला डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई रूग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे युवक रात्री उशिरा येरमाळा येथे देवदर्शनासाठी गेले होते, पहाटे केज कडे येत असताना कळंब शहरात त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. यात रामचंद्र घुले यांचा…
Author: विजयराज आरकडे
केज तहसील कार्यालयाकडून मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली संपन्न प्रतिनिधी : आज दिनांक 28/04/2024 रोजी तहसील कार्यालय केज येथे केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप प्रोग्राम अंतर्गत सायकल रॅली आयोजीत करण्यांत आलेली होती, सदर रॅली मध्ये सरस्वती कन्या प्रशाला केज, वि.दा. कराड वि. केज, सानेगुरुजी निवासी प्रा.वि. केज, स्वामी विवेकानंद वि. केज, या शाळेतील विद्याथ्यांनी सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदवला. सदर उपक्रमांस मा. श्री. दिपक वजाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः सहभाग नोंदवून नागरिकांना प्रोत्साहीत केले. तसेच श्री. अभिजित जगताप तहसीलदार केज, श्री विलास तरंगे तहसीलदार आंबेजोगाई व श्री. लक्ष्मण बेडस्कर…
भविष्यकालीन दृष्टिकोनातून पाणी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज – डॉ. शंकरराव नागरे गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरा आधार मिळतो – डॉ. भगवानराव कापसे केज – भारत हे एक कृषिप्रधान राष्ट्र आहे, तेंव्हा भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. वर्षभराच्या तुलनेमध्ये मान्सून महिन्यात ८०% पाऊस पडतो. तर उर्वरित काळात केवळ २० टक्के पाऊस पडतो. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण भागाची परिस्थिती पाहता मराठवाड्यात पाणी कमी आहे. मराठवाड्याला ६०० टीएमसी पाण्याची गरज असते, परंतु २५० टीएमसीच उपलब्ध होते. आज विदर्भात ९६२ धरणामध्ये २४ टक्के पाणी आहे, पुणे, नाशिक भागातील १७१९ धरणामध्ये ३० टक्के पाणी आहे, कोकणमध्ये ४२ टक्के पाणी आहे तर मराठवाड्यात १०९७…
केज शहरातील तरुणाच्या खुनप्रकरणातील आरोपीचा दोन तासात शोध घेवुन केले अटक आरोपीला २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी केज- केज शहरातील क्रांतीनगर येथील तरुणाच्या खून प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली . याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 23/04/2024 रोजी फिर्यादी नामे राज संजय गायकवाड वय 23 वर्षे व्यवसाय मजुरी रा. क्रांतीनगर केज जि बीड यांनी तक्रार पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली की, त्यांचा मामे भाऊ गोरख महावीर हजारे वय 18 वर्षे रा. क्रांतीनगर केज यांनी त्यांना फोन करुन…