बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ
केज मतदारसंघात 70.31℅ मतदान
केज-
बीड लोकसभा निवडणूक मतदान काल दि. 13 मे रोजी संपन्न झाले आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे.
भाजपा कडून पंकजाताई मुंडे, महाविआ कडून बजरंग बप्पा सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली आहे.
ही लोकसभा निवडणुक अत्यंत चुरशीची झाली असून उमेदवार, कार्यकर्ते यांच्या एकमेकाविरुद्ध केलेले आरोप -प्रत्यारोप यांनी विशेष गाजली आहे.
तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सभाही घेतल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मतमोजणीच्या नंतर निकाल स्पष्ट होणार आहे.
केज मतदारसंघात निवडणूक प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार अभिजित जगताप व संपूर्ण प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी कर्तव्यदक्ष पणा दाखवून ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली आहे.
या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन, व पोलीस प्रशासन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
